मुरकुडोह-दंडारी चा सर्वांगीण विकास करणार : आ. करोटे

0
17

सालेकसा,दि.08ः आमगाव देवरी विधानसभा मतदार संघात मुरकुडोह-दंडारी हा भाग दुर्गम नक्षल प्रभावित व शतप्रतिशत आदिवासी भाग म्हणून ओळखला जात आहे. आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या भागाचा चेहरामोहराच बदलून टाकण्याचा मी संकल्प घेतला आहे. या भागातील अनेक वषार्पासून रखडलेले रोड-रस्ते, आरोग्याची सेवा, सिंचनाची सोय व शिक्षणासारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याकडे. माझे पूर्ण लक्ष आहे. असे आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
मुरकुडोह नं.२ येथे विविध विकास कामाचे उद््घाटन प्रसंगी तसेच माझी आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान सैनिक संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष राजमाता फुलवा देवी कांगे आंतरराष्ट्रीय समाजवाद आदिवासी किसान संस्था नई दिल्ली या उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी के.डी.कांगे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजकुमारी कांगे, जि.प.सदस्या गीता लिल्हारे, प.स.सदस्या सुनीता राऊत, सरपंच ललिता पगरवार, उपसभापती संतोष बोहरे, तालुका काँग्रेस अध्यक्ष वासुदेव चुटे, युवानेते ओमप्रकाश लिल्हारे, गुणाराम मेहर, देवराज मरस्कोल्हे, दिनेश राऊत, प्रभूदयाल वळगाये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मौजा धनेगाव येथे सिमेंट रस्ता, समाज भवन, डुम्बरटोला येथील सिमेंट रस्ता, दहाराटोला येथे सिमेंट रस्ता, टेकाटोला येथे सिमेंट रस्ता, मुरकुडोह नं.१ येथे सिमेंट रस्ता बांधकामाचे आमदार करोटे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तेजराम भलावी, रावजी दरे, कोमल पगरवार, रामजी कुंजाम, रामकृष्ण परते, शंकर उईके, झुमुकलाल टेकाम, सुकलाल मडावी, रोशन टेकाम, जोहन कुंभरे, दिवाकर टेकाम, माणिकराम कुंजाम, देवलाल उईके आदींनी पर्शिम केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.