सडक अर्जुनी- पं.स.सडक अर्जुनी अंतर्गत सौंदड ग्रामपंचायत अंतर्गत भर उन्हाळ्यात जुन महिन्यात रोहयोचे पांदन रस्त्याचे काम सुरू आहे. या पांदन रस्त्याचे कामावर रखरखत्या उन्हात उष्णतेच्या लाहीलाहीने काम कष्ट करून मजुरांचे बेहाल होत आहेत. असहाय छळाने उष्णतेच्या आगीने मजुरांचे अंगाची लाही लाही होत असून मागिल ४-५ दिवसापासून तापमान वाढ झाली असून तापमान ४५ च्या वर ओलांडले आहे. सुयार्चे उष्णतेच्या आगीने मजुरांना घामावून सोडले आहे. सदर रोहयो कामावर उष्णतेच्या बचावासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. मजुरांना उष्णतेच्या उकाड्याने असहाय खुल्या मैदानातील शेतीच्या पांदन रस्त्याचे कामावर होत आहेत. मात्र शासनाचे निर्देशानुसार ग्रामपंचायत कडून कोणतीही सुविधा पुरविली नाही.
सौंदड गाव तालुक्यात सर्वात मोठे गाव असून गावाची लांबी रेल्वे टोली ते पटेल वार्ड २ किमी अंतर असून रोहयो काम होत असलेले पांदन रस्ता पटेल वार्डावरून २किमी अंतरावर चुलबंद नदीच्या काठावर मधू डोंगरवार ते धनराज पातोडे यांचे शेतापयर्ंत पांदन रस्त्याचे कामावर माती टाकण्याचे काम सुरू असून १८0 मी.लांब व ४ मी.रूंद असून सदर काम २ जुन ते ६ जुन २0२२ पयर्ंत ५ दिवस सुरू होते. याकामावर पहिल्या दिवशी ६२७ मजूर कामावर होते, तर ५ जुनला ५६६ मजूर कामावर होते. रोजगार सेवक वनमाला इरले असून या कामावर सदर प्रतिनिधी दोनदा मोक्यावर गेले असता रोजगार सेवक कामावर हजर नव्हते तर रोजगार सेवकांचे मदतगार सुनील डोये व वसंता विठ्ठले हे कामावर हजर मिळाले. त्या दोघांना विचारले असता आमचेकडे आकडे आहेत. पण त्यांना कामावर किती महिला, पुरुष आहेत हेसुद्धा माहित नाही. मोक्यावर मजूरांना पाणी, नेट मंडप व आरोग्य किटची सुविधा उपलब्ध नव्हती. मागिल ४-५ दिवसात तापमान वाढ झाल्याने चंद्रपूर जिल्ह्याचे बरोबरीत तापमानात गोंदिया जिल्ह्यात वाढ झाली. ५ जुनला गोंदिया जिल्ह्याचे तापमान ४६.२ सेल्सिअस एवढे वाढले होते. तापमानात झपाट्याने वाढ झाली असून उष्णतेने रौद्र रूप धारण केले असून नागरिकांना व मजूरांना त्रस्त करून सोडले आहे. उन्हाच्या दाहकतेने ग्रामीण भागातील रस्ते ओसाड पडले आहेत. शेतीच्या कामावर सुद्धा शेतकरी दुपारी दिसत नाहीत. मजूर मात्र या भर उन्हात राबत होते. याबाबत पं.स.चे बिडीओ वाघाये व पं.स.उपसभापती शालींदर कापगते यांना विचारले असता,रोहयो कामावर शासनाचे निदेर्शानुसार ग्रामपंचायत अंतर्गत मजूरांना नेट मंडप, पिण्याचे पाण्याची सोय व मोक्यावर हजेरी पत्रक व झेरॉक्स प्रत ठेवणे आवश्यक आहे असे सांगितले. पण या रोहयो अंतर्गत सुरू असलेल्या पांदन रस्त्याचे कामावर मजूरांसाठी पाण्याची सोय व नेट मंडपाची सुविधा उपलब्ध दिसली नाही.
वास्तविक रोहयोचे काम जानेवारी ते एप्रिल महिन्यापयर्ंत करायला पाहिजे. पण तसे न करता काही ग्रामपंचायत आधीच ठराव मंजूर करवून घेतात पण रोहयोचे काम वेळेवर सुरू करत नाहीत. उलट भर उन्हाळ्यात मे व जुन महिन्यात करवून घेतात. सदर रोहयो अंतर्गत पांदन रस्त्याचे कामावर मजूरांना होत असलेल्या असुविधा बाबत मोका चौकशी करण्याचे आश्वासन बिडीओ वाघाये यांनी दिले आहे.