मुंडीपार येथे जननायक क्रांतिसुर्य बिरसा मुंडा यांना अभिवादन

0
15

गोरेगाव,दि.09ः आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची 122 वी पुण्यतिथी  ग्राम पंचायत कार्यालय मुंडीपार येथे साजरी करण्यात आली.आदिवासी समाजामध्ये मोठी क्रांती घडविण्यासाठी बिरसा मुंडा यांचे नाव घेतले जाते.आदिवासी समाजाच्या उलगुलान आंदोलनाचे ते जनक होते.
बिरसा मुंडा यांना ‘धरती बाबा’ म्हणूनच ओळखले जायचे. त्यांनी आदिवासी समाजात केलेली जनजागृती आणि व्यापक मानवसेवेमुळे आजही असेच ‘धरती बाबा’ मिळावेत, अशी प्रार्थना संपूर्ण देशात केली जाते .म्हणुन आदिवासी भागांमध्ये क्रांतिकारी बिरसा मुंडा ईश्वरासमान पूजले जातात.
लोकनायक बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निम्मिताने ग्राम पंचायत कार्यालयात सरपंच सुमेंद्र धमगाये यांनी त्यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन अभिवादन केले. उपसरपंच जावेद (राजाभाई)खान यांनी बिरसा मुंडा यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी माहिती दिली. यावेळी सरपंच सुमेंद्र धमगाये,उपसरपंच जावेद (राजाभाई)खान,सचिव अरविंद साखरे,तंमुस अध्यक्ष गिरिश पारधी,ग्रा.पं.सदस्य चंद्रगुप्त धमगाये,वन व्यवस्थापन अध्यक्ष टुकेंद्र भगत ग्रामरोजगार सेवक उमेंद्र ठाकुर,राजेंद्र बिसेन, लिपीक सुनिल वाघाडे,परिचर अजय नेवारे,कंसराज शहारे,योगेश गमधरे,अक्षय शहारे, सुनंदा शहारे आदी उपस्थित होते.