नागपूर जिल्हापरिषद अंतर्गत अनुकंपा भरतीची प्रक्रीया ; 20 जुनपर्यंत आक्षेप नोंदवावे

0
11
नागपूर- जिल्हा परिषद अंतर्गत 94 अनुकंपा उमेदवारांची प्रस्तावित निवड प्रतिक्षा यादीनुसार व उमेदवारांच्या शैक्षणिक व तांत्रिक पात्रतेनुसार मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी 9 जून रोजी निवड यादी जाहिर केली. अनुकंपा तत्वावर नियुक्ती संदर्भात पारदर्शकता राहण्याचे दृष्टीने प्रस्तावित निवड यादी www.nagpur.com या संकेस्थळावर व नागपूर जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाच्या नोटिस बोर्डावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
अनुकंपा तत्वावर प्रस्तावित निवड यादीमध्ये कनिष्ठ सहायक (लिपीक)-11, कनिष्ठ सहायक (लेखा)-02, कंत्राटी ग्रामसेवक-20, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक-07, शिक्षण सेवक-01, वरिष्ठ सहायक (लिपीक)-04, अंगणवाडी पर्यवेक्षिका-01, औषध निर्माण अधिकारी-01, आरोग्य सेवक (पुरुष)- 02, परिचर-45 असे एकूण 94 पदांचा समावेश आहे.
या अनुकंपाधारकाच्या प्रस्तावित निवड यादीवर काही आक्षेप असल्यास [email protected] या ई-मेलवर व लेखी स्वरुपात उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य), जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयास 20 जुन 2022 पर्यंत पाठविण्यात यावे. या तारखेनंतर आक्षेप प्राप्त झाल्यास त्याचा विचार करता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी कळविले आहे.