विजयानंतर खा.पटेलांनी चांदपूर येथे केली महाआरती व महाप्रसादाचे वितरण

0
26
तुमसर,दि.११ः- राज्यसभा निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच आगमनप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते व नवनिर्वाचीत राज्यसभेचे खासदार प्रफुलभाई पटेल यांनी एतिहासीक विजयानंतर तालुक्यातील चांदपुर देवस्थान येथे भगवान हनुमानांची पूजा अर्चना करून महाआरती केली.यावेळी तुमसर मोहाडी मतदारसंघाचे आमदार राजु माणिकराव कारेमोरे,माजी आमदार राजेंद्र जैन,माजी खासदार मधुकर कुकडे,माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादाचे वितरण केले.या कार्यक्रमात नवनिर्वाचित खासदार  प्रफुल्लभाई पटेल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी देवचंद ठाकरे, ठाकचंद मुंगूसमारे, सदाशिव ढेंगे,धनजंय तुरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ता, ग्रामवासी, महिला भगिनी,बूथ प्रमुख, पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य, नगर पंचायत सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यानंतर तिरोडा येथे सुध्दा भव्य स्वागत करण्यात आले.