समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी विजय ठकरानीला अटक

0
61

इस्लाम विरोधी टिप्पणी करणे चांगलेच भोवले

देसाईगंज,-येथील कन्नमवार वार्डातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक विजय कुमार ठकरानी याने समाज माध्यमात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी देसाईगंज पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करुन शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ अटक केल्याने शहरात एकच खळबळ माजली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विजय ठकरानी यांनी १६ एप्रिल २०२२ ते १० जुन २०२२ च्या दरम्यान समाज माध्यमातून वादग्रस्त ठरलेल्या नुपूर शर्माला समर्थन करून इस्लाम धर्माबद्दल व मुसलमानांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने जवाहर वार्डातील जावेद अब्दुल गणी शेख यांच्या लेखी तक्रारीवरून देसाईगंज पोलिसांत १३ जुन २०२२ ला राञी उशिरा अपराध क्रमांक २६१/२०२२ अन्वये भादंवि २९५,१५३ अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आल्याने सदर प्रकरण विजय ठकरानी यांना चांगलेच भोवले आहे.
देसाईगंज पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे की, विजय कुमार ठकरानी यांनी इस्लाम धर्माबद्दल व धर्मगुरू यांचे बाबत फेसबुक सोशल मिडीयावर १६ एप्रिल २०२२ ते १० जुन २०२२ चे दरम्यान भडकाऊ पोस्ट टाकुन मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.धर्माचा अपमान करुन शहरातील वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे जातियतेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पोलीस स्टेशन समोर तणाव

विजय ठकराणी यांच्या समाज माध्यमात टाकलेल्या वादग्रस्त पोस्ट वरुन मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जमावाने गुन्हा दाखल करुन तात्काळ अटक करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत रेटून धरली होती. यामुळे बराच वेळ पोलीस स्टेशन समोर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जातीय तेढ निर्माण न करण्यासाठी रात्री उशिरा अटकेची कारवाई करण्यात आली आहे. आज देसाईगंज न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने जामीनावर सुटका केली आहे. आरोपीच्या वतीने अँड तारिक सौदागर यांनी युक्तिवाद केला