-
मंजुर निधी आलेवाडा ग्रामंपचायतीला व बांधकाम केशोरी ग्रामपंचायतीला
-
सचिव व सरपंचाच्या कार्यप्रणीलीवर प्रश्न चिन्ह
-
गावकऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार
देवरी,दि18:- आलेवाडा गट ग्रामपंचायत ही आदिवासी बहुल अतिदुर्गम भागात येत असल्याने आदिवासी उपाय योजना योजनेअंतर्गत गट ग्रामपंचायत आलेवाडा अंतर्गत येत असलेल्या मौजा मोहगाव करिता रस्ते, पूल बांधकामाकरिता रुपये १४ लाख ६१ हजार १५३ चा निधी मंजूर करण्यात आला. परंतु, आलेवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच व सचिव यांनी आलेवाडा ग्रामपंचायतीचा निधी दुसऱ्याच ग्रामपंचायतीवर खर्च केल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्या जात आहे.
सविस्तर वृत्त असे की, आदिवासी उपाय योजना योजनेअंतर्गत गट ग्रामपंचायत आलेवाडा अंतर्गत येत असलेल्या मौजा मोहगाव करिता रस्ते, पूल बांधकामाकरिता रुपये १४लाख ६१ हजार१५३ चा निधी मंजूर करण्यात आला व सदर बांधकामाचे कॉन्ट्रॅक्ट ग्रामपंचायत सचिव स्तरावर देण्यात आल्याचे बांधकाम स्थळी लावण्यात आलेल्या फलकावरून कळते. गावकऱ्यांच्या तक्रारीवरून सदर मंजूर निधी ही गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या मौजा मोहगाव हददीत खर्च न करता गट ग्रामपंचायत केशोरी अंतर्गत येणाऱ्या मौजा निलज गावच्या हद्दीत खर्च करण्यात आलेला आहे. आणि तो कोणत्या नियमाने खर्च केला? असा प्रश्न सर्व सामान्यानां पडला आहे. या भोंगळ कारभाराची व झालेल्या कामाची बाब गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने संपूर्ण मोहगाव वाशी एकत्रित येऊन सदर कामाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली आहे. या दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे.
- जैनसिगं कोराम, ग्रामपंचायत सदस्य आलेवाडा
मी आलेवाडा ग्रामपंचायतीचा सदस्य असून मला सदर कामासंदर्भात कोणतीही माहिती नाही. सरपंच व सचिव यानी कुणालाही विश्वासात न घेता या कामाची अफरातफर केली आहे. यात माझा कोणताही हस्तक्षेप नाही.
चेतना नंदरधाने, ग्रामपंचायत सचिव
मि आलेवाडा ग्रामंपचायतला सचिव पदावर सहा महिन्या अगोदरच रुजु झालो. सदर कामाची पाहनी केली,काम पुर्णत्वात असल्यामुळे रुपये अकरा लक्ष रुपयाचे बिलाची उचल ग्रामपंचायतने केलेली आहे.
चरनदास शहारे,गावातील नागरिक
आलेवाडा ग्रामंपचायतच्या सचिव व सरपंच यानीं आलेवाडा ग्रामपंचायत हद्दीतील मोहगावला मंजुर झालेली निधीचा गैर वापर करत दुसर्याच ग्रामपंचायतला बांधकाम केला. व त्यानी पैस्याचीही उचल करुन गाव विकासाच्या निधीची अफरातफर केली आले. त्या दोन्ही पदाधीकार्यावर योग्य ती कार्यवाही होने गरजेची आहे.