तिरोडा, दि.19 : तिरोडा तालुक्यातील कवलेवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य म्हणून किरण पारधी हे निवडून येताच त्यांनी 1 कोटी 20 लाख रुपये खर्चाचे अनेक विकासकामे आणले. यात सिमेंट रस्ता, बंदिस्त नाली, वॉलकंपाऊंड, गट्टू लावणे अशा अनेक कामांचा समावेश आहे. या विविध विकास कामांचे भूमिपूजन सुद्धा जिप सदस्य किरण पारधी यांच्या हस्ते करण्यात आले.
शुक्रवार, 17 जून 2022 रोजी क्षेत्रात 10 बोअरवेल मंजूर करून आणले, तर आज शनिवार, 18 जून 2022 रोजी ठिकठिकाणी 1 कोटी रुपये लागतीचे सिमेंट रस्ता, बंदिस्त नाली, वालकंपाउंड, गट्टू लावणे अशा अनेक कामांचे भूमिपूजन केले.
या वेळी कवलेवाडा पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र चौधरी, वासुदेव हरिणखेडे सरपंच मुंडीपार, शकुंतला गजभिये उपसरपंच मुंडीपार, डीलूराम चौधरी सरपंच बेलाटी बु., दर्याराव रिनाईत पोलीस पाटील बेलाटी, जितेश बोदेले ग्रा.पं. सदस्य कवलेवाडा, वनिता सेलोकर ग्रा.प. सदस्य, संजय पटले, बाबुलाल चौधरी सेवा सहकारी अध्यक्ष, चूंनीलाल चौधरी सेवा सहकारी उपाध्यक्ष, राजेंद्र साठवणे, रंगलाल रहांगडाले, जी.जी. जमाईवार ग्रामसेवक मुंडीपार, दिलीप चौरे, संदीप हरिणखेडे ,घनश्याम पटले, शंकर पटले, पुरुषोत्तम रहांगडाले, सुरेंद्र नागपुरे, रुपेश भगत, अनिल पटले, ओमप्रकाश चौधरी, राधेश्याम वाघाडे, राजाराम सोनवणे, परमेश्वर साठवणे, विनोद चौधरी, डूलीचंद साठवणे, मंगला बिसेन परिचर, गुलाब कटरे सरपंच मरारटोला, भीमराव साखरे उपसरपंच, मनोज उपरिकर पोलीस पाटील, नेरकर, चंद्रकुमार झगेकार, इंदल चौधरी रोजगार सेवक आदी उपस्थित होते.जिप सदस्य किरण पारधी यांनी आपल्या कवलेवाडा क्षेत्रात अनेक विकासकामे आणले, त्यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.