विरांगणा महाराणी दुर्गावती पुण्यतिथीनिमित्त महिला मेळाव्याचे आयोजन

0
28

गोंदिया,दि.25ः- तालुक्यातील गंगाझरी येथे विरांगणा महाराणी दुर्गावती मडावी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त आदिवासी महिला प्रबोधन मेळाव्याचे आयोजन 24 जून रोजी करण्यात आले होते. तसेच आदिवासी कॉलोनी (कुडवा) गोंदिया येथे नॅशनल आदिवासी महिला फेडरेशन व गोंडवाना मित्र मंडळाच्या संयुक्त विद्यमानाने पुण्यतिथी साजरी करण्यात आली.गंगाझरी येथे महाराणी दुुर्गावती यांच्या मुर्तीचे अनावरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाजातील बुजुर्गवर्ग,मातृशक्ति,पितृशक्ति,युवावर्ग तसेच आयोजक मंडळीनी सहकार्य केले.