मुंडीपार व तेढा येथे राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी

0
13

ग्रा.पं. मुंडीपार येथे रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी
गोरेगाव,दि.26 जूनः- तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली.पुरोगामी महाराष्ट्रात हा दिवस “सामाजिक न्याय ” दिन म्हणून मोठ्या गौरवाने साजरा केला जातो.
महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या तीन महान व्यक्तींमुळे आपणास सामाजिक न्यायाचा पाठ अनुभवयास मिळतो.राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने उपसरपंच जावेद(राजा)खान यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन माल्यार्पण केले.सरपंच सुमेंद्र धमगाये, तं.मु.स.अध्यक्ष गिरिश पारधी, सचिव अरविंद साखरे, ग्रामरोजगार सेवक उमेन्द्र ठाकुर,चेतलाल चौधरी,शिवशंकर बिसेन,राजेंद्र बिसेन,ज्ञानेश्वर राऊत,सोनु शेंडे,राहुल राऊत, संगनक परिचालक रोहित पांडे, लिपीक सुनिल वाघाडे, परिचर अजय नेवारे इत्यादी उपस्थित होते.

संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महा.तेढा येथे सामाजिक न्याय दिवस साजरा

गोरेगाव,दि.26 जूनः तेढा येथील संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे राजर्षि छत्रपति शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य एस.बी.गोस्वामी हे होते. या प्रसंगी प्रा.आर.के.धारगावे,प्रा.पी.झेड.कटरे ,प्रा.डॉ.जी.एम.बघेले ,प्रा.पी.जी.कटरे ,प्रा.एन.सी.रहांगडाले ,के.डी.ठाकरे,सी.सी.शेन्डे ,एन.जे.साखरे,प्रा.डी.एम.तितरमारे,आर.पी.दुधबूरे,जी.टी.राउत,एल.आर.बिसेन,रामटेके, ,श्री.मुंगमोडे,श्री.कुकडे,प्रा.कु.ए.बी.भोयर,कु.एस.जी.ठाकरे,प्रा.कु.एस.पारधी व इतर सर्व प्राध्यापक वर्ग व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी समान संधि केंद्र समन्वय अधिकारी प्राचार्य एस. बी. गोस्वामी सर व सहायक समन्वय प्रा. डॉ. जी. एम. बघेले यांनी राजर्षि शाहू महाराज यांच्या जीवन व जन हित कार्याचे मार्गदर्शन केले. तसेच समान संधी केंद्र विषयी मार्गदर्शन केले.