गोरेगाव,दि.02ः तालुक्यातील मुंडिपार ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालय हिराटोला येथील विद्यार्थीनी उत्कर्षा गाडरे, त्रिवेणी हतीमारे , स्नेहल गभने , उर्वशी गहणे , तृप्ती गेडाम , ईशा गोल्हार , सविता कणोजे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मुंडिपार येथे २ जुलै रोजी कृषी दिन साजरा केला.
मुंडिपार येथे आयोजीत करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र कृषी दिन’ मध्ये प्रमुख अतिथी सरपंच सुमेंद्र धमघाये , उपसरपंच राजा भाई खान, तंटामुक्ती अध्यक्ष गिरिश पारधी , तंटामुक्ती सदस्य डि म. राऊत , प्राथमिक शाळाचे मुख्याध्यापक बी ये. रहांगडाले तसेच रेखाताई शहारे ,श्री कटकवार,श्री मेश्राम, श्रीमती टेंभरे, गावतील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी पाहूण्यांच्या हस्ते प्रतीमेचे पूजन व वृक्षारोपण करण्यात आले.
मनोहर भाई पटेल कृषि महाविद्यालयाच्या विद्यार्थीनीनी कृषि दिनानिमित्त गावात प्रभातफेरी काढून वृक्ष लागवड याबद्दल जनजागृती केली.या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. अवतरे, विषयतज्ञ भगत,कार्यक्रम अधिकारी पि. एस. राऊत मॅडम, कार्यक्रम अधिकारी तागडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दिन साजरा करण्यात आला.