गोंदिया पंचायत समितीच्यावतीने कृषी दिन कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सत्कार

0
20

गोंदिया,दि.02-येथील पंचायत समितीच्या सभागृहात पंचायत समिती गोंदिया व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमत्री कै.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त 1जुलै 2022 रोजी कृषी दिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती मुनेशभाऊ राहांगडाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपसभापती नीरजकुमार उपवंशी,गटविकास अधिकारी राजकुमार पुराम,तालुका कृषी अधिकारी धनराज तुंमडाम,राजूभाऊ चव्हाण शास्त्रज्ञ,बालविकास प्रकल्प अधिकारी भोसले,जि.प.सदस्य कु.वैशाली पंधरे कु. आनंदा वाढीवा,आश्विनी रवी पटले तसेच पंचायत समिती सदस्य शंकरलाल टेंभरे,अजाबराव रिनायत,शिवलाल जाभरे,पुरुषोत्तम उइके,विनोद बिसेन,योगराज उपराडे,श्रीमती सोनुला बरेले,जितेश्वरी राहंगडाले,शशीबाई कटरे ,सरला चिखलोंढे ,विद्याकला पटले,टोमेश्वरी कटरे,शैलजा सोनवणे उपस्थित होते. यावेळी सभापती मुनेशभाऊ राहंगडाले,उप सभापती नीरजकुमार उपवंशी ,पंचायत समिती सदस्य शंकरलाल टेंभरे,अजबराव रिनायत यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका कृषी अधिकारी तुमडाम यांनी केले.कार्यक्रमाचे निमित्ताने प्रगतीशील शेतकरी इंद्रराज लेकीराम पटले रा.बघोली व सुरजलाल पुराणलाल पटले रा.तेढवा यांचा उत्साह वाढण्याचे दृष्टीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत नवीन विहीर बांधकाम केलेले लाभार्थी धनालाल पुनाराम गजभिये रा.तेढवा यांचे सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार अधिकारी आर.के.कटरे व आभार व्ही.एस.राठोड यांनी मानले.