आमगाव,दि.02ः गडचिरोली चिमूर लोकसभा खासदार अशोक नेते यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामीण रुग्णालय येथे रुग्ण सेवा कार्य कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी रुग्णांना फळ वितरण तसेच वृक्षारोपण करण्यात आले.रुग्ण सेवेत अतिसार लागण अतिदक्षता कक्ष रुग्णांनाच्या सेवेत उभारण्यात आले.
यावेळी रुग्णालयातील रुग्णसेवा व व्यवस्थापन यावर चर्चा करण्यात आले.तर रुग्णांना सेवेतील त्रुटी दूर करण्यासाठी सल्ला व मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी भाजप तालुका अध्यक्ष कांशीराम हुकरे,यशवंत मानकर,घनशाम अग्रवाल,मनोज सोमवंशी,उत्तम नंदेश्वर, कैलास तिवारी,कमलेश चुटे,राजेश शिवणकर ,मोहन वानखेडे,कैलास बहेकार,धनलाल मेंढे, झनक बहेकार,संतोष श्रीखंडे,अशोक मोदी,राजेश अग्रवाल,बलराम व्यास,मधू शिवणकर,संजय तिवारी,राजू भांडारकर आदी कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. नगर परिषद परिक्षेत्र परिसरात मुख्याधिकारी
डॉ. पवन म्हात्रे व कर्मचारी यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले.