सभापती रहागंडालेंच्या हस्ते अर्जुनी येथे जिमचे लोकार्पण

0
19

गोंदिया,दि.09ः- तालुक्यातील अर्जुनी येथील जिल्हा परिषद शाळा परिषद तयार करण्यात आलेल्या 7 लाख रुपये निधीतील जिमचे लोकार्पण तसेच मातोश्री पांदन रस्ता 24 लाख व मनरेगा अंतर्गत 5 लाख रुपयाच्या निधीतून गट्टूबांधकामाचे भूमिपूजन सभापती मुनेश रहागंडाले यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सरिता उमेंद्र गौतम होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य राहुल मेश्राम,उपसरपंच शेखरभाऊ शहारे,ग्राम पंचायत सदस्य नितिनभाऊ तूरकर ,लतीश तिवारी,उषाताई उदेलाल सहारे,पोलीस पाटील ओमप्रकाश सहारे,शाळा शिक्षण समिति अध्यक्ष नरेंद्र गजभिए, ग्रामसेविका कु.एल.पी.डोंगरे,जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच शिक्षक उपस्थित होते.