मुल्ला येथे सर्पदंशाने शेतकऱ्याच्या पशूधनाचे नुकसान

0
32

देवरी,दि. 4- येथून 12 किलोमीटर अंतरावरील मुल्ला येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यात नाग सापाने प्रवेश करून  दोन बोकूड आणि दोन कोंबड्यांना दंश केल्याने सुमारे 25 हजाराचे नुकसान केल्याची घटना आज मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

सविस्तर असे की, मुल्ला येथील प्रतिष्ठित शेतकरी आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ दशरथ गौपाले यांच्या घरानजिकच्या गोठ्याला लागून असलेल्या एका खोलीत कोंबडे आणि शेळ्या-बकरे बांधलेली राहतात. गेल्या दोन तीन दिवसापूर्वी गौपाले यांच्या कोंबडे दररोज बाहेर मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. पण या गोष्टीकडे या शेतकरी कुटुंबाने फारसे लक्ष दिले नाही. असे असताना आज सकाळी त्याच खोलीतील एक पाटरू आणि एक बोकड यांचेसह दोन कोंबडे मुृतावस्थेत पडून असल्याने गौपाले यांना संशय आला. त्यावरून खोलीची पाहणी केली असता तेथे भला मोठा विषारी नाग साप दिसून आला. या सापाने या प्राण्यांना दंश केल्याने ते मृत पावल्याचे यावरून लक्षात आले.

या घटनेमुळे या शतकरी कुटुंबाचा सुमारे 25 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.