36.6 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ मोहाडी ग्रामपंचायतच्यावतीने अहिल्याबाई होळकर जयंती व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्यक्रम

मोहाडी ग्रामपंचायतच्यावतीने अहिल्याबाई होळकर जयंती व स्वच्छता मिशन अंतर्गत कार्यक्रम

0
44

blank

गोरेगाव,दि.३१ः तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायत येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोंदिया जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती डॉ.लक्ष्मण भगत प्रमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डाॅ.लक्ष्मण भगत अर्थ बांधकाम सभापती होते.यावेळी सरपंच नरेंद्र चौरगडे, ग्राम.पं.सदस्य व गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ.भगत यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
स्वच्छता अभियानाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत गावातील प्रत्येक कुटुंबाला ओला आणि सुका कचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कचरा कुंडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गावातील स्वच्छता आणि जनजागृतीत नक्कीच होईल असे विचार यावेळी पाहुण्यांनी व्यक्त केले.

blank