प्रविण कोचे यांचा महसुल दिनी उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून प्रशस्ती पत्र देवून सत्कार

0
72

गोंदिया,दि.04ः- “महसुल दिन” निमीत्त दरवर्षीप्रमाणे यावर्षीही प्रशासन तर्फे उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया, अप्पर तहसील कार्यालय गोंदिया, तहसील कार्यालय गोंदिया यांच्या संयुक्त विद्यमाने “महसूल दिन” साजरा करण्यात आला. या दिवशी विभागातील अधिकारी-कर्मचारी यांचे वर्षभरात केलेल्या कामाचे स्वरूप बघून यथोचित सन्मान केले जाते. महसुल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्या कडून सरळ लोकांच्या दैनंदिन गरजांची पुर्तता होणारे कार्य दर दिवशी होत असतात. गोंदिया जिल्ह्यातील अन्य अधिकारी- कर्मचारी यांच्या प्रमाणेच “पोलीस पाटील” हे सुध्दा महसुल विभागातील मानधन तत्वावर असलेले शासनाचे अंतिम घटक आहेत. वर्षभरात दिलेले कार्य- जवाबदारी ने उत्तम रित्या करुन बहुमुल्य सहकार्य केल्याबद्दल यावर्षी “पोलीस पाटील” यांचेही सन्मान उपविभागीय अधिकारी कार्यालय, गोंदियाच्या वतीने उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील यांचे अध्यक्षतेखाली व प्रमुख पाहुणे म्हणून गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी मानसी पाटील, परिविक्षाधीन तहसिलदार इंद्रायणी गोमासे, अप्पर तहसिलदार अनिल खडतकर, तहसिलदार संतोष खंडारे, नायब तहसिलदार (निवडणुक)पालांदुरकर, नायब तहसिलदार  सीमा पाटणे, माजी निवासी उपजिल्हाधिकारी के.एन.के.राव, महसुल विभागाचे अधिकारी – कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी, शेतकरी, पोलीस पाटील, कोतवाल व अन्य गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीतीत नगपूरा(मुर्री)येथील पोलीस पाटील “प्रविणकुमार लक्ष्मण कोचे” यांचा”प्रशस्तीपत्र” देवून गौरव करण्यात आला.