
गोंदिया-राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब दिन 17 मे च्या अनुषंगाने एनसीडी जनजागृती अभियानाचे आयोजन दि. 17 मे 2025 ते 16 जून 2025 पर्यंत संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रशांत तुरकर व जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांच्या कल्पक विचारातुन दि. 3 जुन रोजी नगर परिषद गोंदिया येथील कार्यालयात आरोग्य शिबीर संपन्न झाले. नगर परिषद गोंदिया येथील कार्यालयातील आरोग्य शिबीरात एकुण 43 अधिकारी व कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यात आल्याची माहीती जिल्हा समन्वयक डॉ.स्नेहा वंजारी यांनी या प्रसंगी दिली.नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत कांबळे यांचे विशेष सहकार्यातुन आरोग्य शिबीर यशस्वी पार पडले.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक उच्च रक्तदाब जनजागृती अभियान दि. 17 मे 2025 ते 16 जून 2025 पर्यंत संपूर्ण महिनाभर जिल्ह्यात विविध ठिकाणी आरोग्य शिबीरातुन मधुमेह व रक्तदाबाची तपासणी करण्यात येत असुन लोकांमध्ये ह्या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहीती तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनम जाधव यांनी याप्रसंगी दिली आहे.
दि. 3 जुन रोजी शिबिरात एकूण 43 अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली.यामध्ये मुख्यतः रक्तदाब (बीपी) आणि रक्तातील साखर (ब्लड शुगर) यांची तपासणी करण्यात आली.राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे डॉ.सोनम जाधव यांनी तपासणी व समुपदेशन केले. सदर तपासणीमुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे असे होते. ह्या वेळी राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे जनजागृती पोम्पलेट वाटप करुन जनजागृती करण्यात आले.सदर आरोग्य शिबीर यशस्वी होण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉ.सोनम जाधव,डॉ.स्नेहा वंजारी,निधि मिश्रा,यांनी उपस्थित राहुन आरोग्य सेवा दिली.