37.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ गडचिरोली जिल्ह्यामध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविणाऱ्यांवर कारवाई करणार  – अन्न व नागरी पुरवठा...

गडचिरोली जिल्ह्यामध्ये निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविणाऱ्यांवर कारवाई करणार  – अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण 

0
45

blank

मुंबई, दि. 19 : गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्याकरिता निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा करण्यात आल्याच्या प्रकरणाबाबत योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले.

गडचिरोली जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना वितरित करण्याकरिता निकृष्ट दर्जाचा तांदूळ पुरविण्यात येत असल्याबाबत सदस्य डॉ.परिणय फुके यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला उत्तर देताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली.

जिल्हा प्रशासनाकडून अहवाल प्राप्त झाला असून या प्रकरणातील दोषींवर नियमानुसार योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच याबाबत लवकरच बैठक घेण्यात येईल, असेही अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधानपरिषदेत सांगितले.या चर्चेत सदस्य प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.

blank