
अर्जुनी मोर-राष्ट्रस्तरीय इंडियन आयडल स्टार् अवार्ड 2022 साठी छाया बोरकर यांची नवी मुंबई ,महाराष्ट्र संचालिका मेघा महाजन यांनी केली आहे. छाया बोरकर या मातोश्री जिजाऊ बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक व सचिव असून त्या साहित्यिक, लेखिका , कवयित्री ,असून सामाजिक, राजकीय ,शैक्षणिक, व सांस्कृतिक ,क्षेत्रात कार्यरत असून त्या संस्थेअंतर्गत” गाव तिथे प्रशिक्षण “असे अनेक व्यावसायिक प्रशिक्षण राबत असून या प्रशिक्षणातून स्त्रियांचे मनोबल वाढवून हाताला रोजगार मिळवून जीवनमान उंचावण्यास जगण्यास मदत होत असून स्वतःच्या पायावर उभे होऊन ध्येय,निष्ठा व मनोबल प्रभावित करून स्वावलंबनाचे मदतीचे व्यावसायिक शिक्षण देण्याचे सर्वोत्तम कार्य पार पाडत असून त्यांच्या साहित्य लेखन व इतर कार्याची सर्वोत्तम, उत्कृष्ट, या बाबीची नोंद घेत त्यांची निवड करण्यात आली असून 11 सप्टेंबर 2022 ला नवी मुंबई हॉटेल थ्री स्टार खारघर येथे सकाळी १०.३० वाजता संपन्न होणार आहे.