जिल्ह्यातील 6 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर

0
27

13 ऑक्टोबर रोजी होणार मतदान

          गोंदिया,दि.8 : राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार माहे जानेवारी 2021 ते माहे मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुकांसाठी संगणकप्रणालीद्वारे राबविण्याचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमानुसार गोंदिया जिल्ह्यातील ता.गोंदिया- ग्रामपंचायत डोंगरगाव, ता.गोरेगाव- ग्रामपंचायत निंबा, ता.सडक अर्जुनी- ग्रामपंचायत श्रीरामनगर, ता.देवरी- ग्रामपंचायत सुकळी, ता.अर्जुनी मोरगाव- ग्रामपंचायत सिरेगावबांध व ग्रामपंचायत भरनोली या 6 ग्रामपंचायतीतील सदस्य पदासह थेट सरपंच पदांकरीता दिनांक 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार असून मतमोजणी दिनांक 14 ऑक्टोबर 2022 रोजी होणार आहे.

         राज्य निवडणूक आयोगाचे आदेशानुसार निवडणूका असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 7 सप्टेंबर 2022 पासून आचारसंहिता लागू होईल व ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंतच्या कालावधीसाठी अंमलात राहील, याची सर्व कार्यालय प्रमुखांनी नोंद घ्यावी. असे उपजिल्हाधिकारी (सामान्य) लिना फलके यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.