प्राथमिक आरोग्य केंद्रात सेजगावला समाविष्ट करा

0
18

सामाजिक कार्यकर्त्यांचे वरिष्ठांना निवेदन
एकोडी : तिरोडा तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले सेजगाव ,या गावात उपकेंद्र असून प्राथमिक आरोग्य केंद्र १७ किमी. अंतरावर इंदोरा बु. येथे आहे. दरम्यान गावातील नागरिकांना उपचारासाठी अवघ्या ३ किमी. अंतरावर असलेल्या गोंदिया तालुक्यातील एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा आसरा घ्यावा लागतो. मात्र यामुळे अनेक लाभाच्या योजनांपासूनही लाभार्थ्यांना वंचित रहावे लागते. तेव्हा सेजगावला एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात समाविष्ट करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते धमेंद्र सतीसेवक यांनी खासदार प्रफुल्ल पटेल तसेच यंत्रणेच्या अधिकार्‍यांना निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
एकोडी गावापासून अवघ्या तीन किमी. अंतरावर सेजगाव आहे. मात्र सेजगाव हा गाव तिरोडा तालुक्यात असून गावात उपकेंद्र आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्र तिरोडा खैरलांजी मार्गावरील इंदोरा येथे आहे. हा अंतर जवळपास १७ कि.मी.चा आहे. त्यामुळे गावातील आरोग्य विषयक गरजा पुर्ण करण्यासाठी ग्रामवासीयांना एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्र अथाव गोंदिया येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात धाव घ्यावी लागले. यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांचा अनेक लाभापासून लाभार्थ्यांना वंचित रहावे लागत आहे. तेव्हा सेजगाव या गावाला लगतच्या एकोडी प्राथमिक आरोग्य केंद्रात समावष्टि करण्यात यावे, अशी मागणी समोर आली असून सामाजिक कार्यकर्ते धमेंद्र सतीसेवक यांनी खासदार प्रफुल्ल पटेल, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, जि.प.चे आरोग्य अधिकारी, जि.प.सदस्य अश्विनी पटले तसेच अध्यक्ष रुग्णकल्याम समिती प्राथमिक आरोग्य केंद्र इंदोरा बु. आदींना निवेदन दिले आहे. तसेच या विषयाला घेवून ग्रामवासीयांनीही सेजगाव हे एकोडीला समावष्टि करावे, असा सुर आवडला आहे.