मानव जातीने नव्हे,कर्माने मोठा होतो-संत जागेश्वर देव महाराज

0
11

गोरेगाव ता २८/०९:-मानवाची ओळख त्याच्या जाती,रुप यावरुन होत नसुन माणसाने केलेल्या कर्मावरुन त्याची ओळख होत असते.चरित्र उत्तम असल्यास महापुरुष म्हणून समाजात गनणा केली जाते असे उद्गगार धर्मगुरू संत जागेश्वर देव महाराज चित्रकुट धाम यांनी संगितमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कथा प्रवचनात सर्वाटोला येथे पंचायत समिती सदस्य ओमप्रकाश कटरे यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात ते मार्गदर्शन करताना बोलत होते.
संगितमय ज्ञानयज्ञ कथा, प्रवचन कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी (ता २५) सभापती झामसिंग बघेले यांच्या‌ अध्यक्षतेखाली करण्यात आले.यावेळी सभापती संजय टेंभरे,माजी खासदार खुशाल बोपचे, बोधसिह भगत,जगदिश येरोला, सुनील रहांगडाले,देशराज रहांगडाले,रोशनलाल रहांगडाले,शकुनबाई गौतम उपस्थित होते.
संत जागेश्वर देव महाराज म्हणाले की, जीवनात पत्नीला अनंण्य साधारण महत्व आहे.पत्नीशिवाय मानवाचे जीवन अर्धवट आहे.पत्नीला मनातील भावना व्यक्त करता येतात.पण मुलगा, सुनेला मनातील भावना सांगु शकत नाही.पत्नीविना मनुष्य वैराग्यमय जीवन जगत असतो.विवाह हा जीवनाचा प्रथम यज्ञ आहे. संगितमय श्रीमद् भागवत सप्ताह २ आक्टोबर पर्यंत चालणार असून दरदिवशी भागवत कथेव्दारे विविध विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
या भागवत सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी ओमप्रकाश कटरे,प्रशांत कटरे, श्रीकांत कटरे, गौरीशंकर कटरे, रुपचंद कटरे,श्रूजल कटरे,देशराज रहांगडाले,बंटी गौतम ,तिलकचंद पुंडे प्रयत्नशील आहेत.