
व्यवसाय निर्यात सुलभता संमेलन
गोंदिया,दि.29 जिल्हयातील निर्यातदार उद्योगांना निर्यात वाढविण्याचे दृष्टीने केंद्र शासन व राज्य शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रोत्साहने, व्यवसाय निर्यात सुलभता व एक जिल्हा एक उत्पादन इत्यादी विषयावर उद्योग संचालनालय व सिडबी यांचे संयुक्त विद्यमाने राईस मिल असोशिएशन हॉल, गोंदिया येथे निर्यात संमेलन आयोजित करण्यात आले होते. तांदुळासोबतच इतर कृषी उत्पादनाच्या निर्यातीवर भर देण्याची गरज असल्याचे मत निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांनी व्यक्त केले.
सदर संमेलन राज्याचे विकास आयुक्त (उद्योग) डॉ. हर्षदिप काबळे तसेच जिल्हाधिकारी नयना गुंडे यांचे मार्गदर्शनाखली आयोजित करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे हे होते. या शिवाय राईस मिल असोशिएशनचे अध्यक्ष अशोक अग्रवाल,लाख इंडस्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष गजानन अग्रवाल, सिडबी व्यवस्थापक श्री. अहिरवार, मैत्रिचे नोडल अधिकारी आर. के. काबळ, एक्सर्ट कन्सल्टंट सचिन बोरकर, स्टेट बँकेचे अधिकारी ओम प्रकाश कोंपलवार माविमचे जिल्हा समन्वयक संजय संगेकर, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. बदर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे उदघाटन जयराम देशपांडे यांनी दिप प्रजलन करुन केले. श्री. देशपांडे यांनी तांदुळासोबतच इतर कृषी उत्पादनाच्या निर्यातीवर भर देण्याची गरज असल्याचे सांगितले. प्रमुख निर्यातदार अशोक अग्रवाल व गजानन अग्रवाल यांनी तांदुळ व लाख निर्यातीचे बाबत माहिती दिली. त्रयस्थामार्फत निर्यात होत असल्यामुळे खऱ्या निर्यातीचा आखडा दिसुन येत नसल्याचे अशोक अग्रवाल यांनी सांगितले. जिल्हयामध्ये एक हजार कोटी नव्हे तर आठ हजार कोटी रुपयाचा तांदुळ निर्यात होत असल्याचे त्यांनी सांगितले.
ब्रोकन राईस निर्यातीवर बंदी मुळे अडचणी निर्माण झाल्याचे सांगितले गजानन अग्रवाल यांनी सांगितले. व्यवसाय सुलभिकरण अतर्गत मैत्री पोर्टलची माहिती आर. के. कांबळे यांनी दिली. मैत्री पोर्टल व्दारे 98 टक्के अर्जदाराचे अर्ज निकाली काढण्याबद्दल माहिती दिली. सिडकोचे अहिरवार यांनी सिडकोच्या विविध योजनाची उद्योगांना कशी मदत होऊ शकते या बदल मार्गदर्शन केले. स्टेट बॅकेंचे ओम प्रकाश कोंमपलवार यांनी निर्याती संबधी स्टेट बॅके मार्फत राबविण्यात येणारी विविध सोई सवलतीबदल माहिती दिली. मनोहर उईके यांनी हस्तकलेच्या वाढी करीता बँकेकडुन अर्थ सहाय व शासनाकडुन मदतीची मागणी केल. श्री. बदर यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांबदल माहिती दिली तसेच आभार प्रदर्शन केले.