Home विदर्भ गंगाझरी येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह समारोपीय मेळावा संपन्न

गंगाझरी येथे राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत पोषण माह समारोपीय मेळावा संपन्न

0

गोंदिया,दि.01 :- राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत 30 सप्टेंबर रोजी एकात्मिक बाल विकास सेवा योजना,प्रकल्प – गोंदिया 01 अंतर्गत आदिवासी बहुल गंगाझरी येथे एकोडी बीटस्तरीय राष्ट्रीय पोषण अभियान समारोपीय मेळावा उत्साहाता पार पडला.या मेळाव्यात पोषण अभियानाशी संबंधित पोषक आहार प्रदर्शनी , रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. तसेच उपस्थित प्रमुख मार्गदर्शक अतिथींकडून गावकरी महिलांना , नागरीकांना मुलांच्या आहारात स्थानिक पालेभाज्या व अन्नपदार्थांचा समावेश करावा, आहार व आरोग्याप्रती जागरूक राहावे, लोहयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे, दरमहा बालकांची नियमित रक्त तपासणी करून बालकांच्या शरीरात वाढीसाठी कोणते आवश्यक जीवनसत्वांची कमतरता आहे, याची माहिती करून घ्यावी तसेच अंगणवाडी केंद्रांच्या सेवांचा लाभ घ्यावे, आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या पोषण अभियान मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत गंगाझरीचे सरपंच सोनूभाऊ हरडे होते. मेळाव्याचे व पोषक आहार प्रदर्शनी व रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन एकोडी जि.प.क्षेत्राचे जि.प. सदस्य अश्विनीताई रविकुमार पटले यांनी केले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गंगाझर क्षेत्राचे पं.स.सदस्य वंदनाताई प्रकाश पटले,तसेच प्रमुख मार्गदर्शक अतिथी म्हणून आय.सी.डी.एस. प्रकल्प – गोंदिया 01 चे बालविकास प्रकल्प अधिकारी  नरेश सोनटक्के, प्रकल्प – गोंदिया 02 चे बालविकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले, विस्तार अधिकारी (सांख्यिकी)  तिर्थराज ते. उके, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र-गंगाझरीचे वैद्यकीय अधिकारी डाँ. कांबळे हे उपस्थित होते. तसेच गंगाझरी ग्रा.पं.सदस्य , सामाजिक कार्यकर्ते , आरोग्य विभाग कर्मचारी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन रामपुरी अंगणवाडी सेविका कल्पना बिसेन यांनी केले. कार्यक्रमाची प्रास्तावना एकोडी बीटचे अंगणवाडी पर्यवेक्षिका कु.गंगासागर पंधरे यांनी सादर केली व उपस्थितांचे आभार प्रदर्शन ओझाटोला अंगणवाडी सेविका शिला भगत यांनी केले. सदर पोषण अभियान मेळावा यशस्वी करण्यासाठी गंगाझरीचे अंगणवाडी सेविका तेजस्विनी गायधने, इंद्रावती लिल्हारे, मदतनीस सतन बिसेन,टिकायतपूर अंगणवाडी सेविका माधुरी बघेले यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच एकोडी बीटच्या अंगणवाडी बीट परिक्षेत्रातील सर्व अंगणवाडी सेविका , मदतनीस यांनी सहकार्य केले.

Exit mobile version