गोरेगाव,दि.03- तालुक्यातील अ दर्जा प्राप्त आदर्श सार्वजनिक वाचनालय मोहाडी येथे २ ऑक्टोबंरला ग्रंथालयाचा ४१ वा वर्धापन दिन तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपवनसंरक्षक यु.टी.बिसेन हे होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी आमदार व गोंदिया जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष दिलीप बंन्सोड,माजी जि.प.सदस्य जगदीश येरोला,के.के.डोंगरे,डुमेश्वर चौरागडे, संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे, संस्थेचे उपाध्यक्ष मदनलाल बघेले, संस्थेचे सदस्य हिरालाल महाजन, देवदास चेचाने, सुभाष चौरागडे, चंन्द्रकुमार चौरागडे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप बंन्सोड यांनी ग्रामीण भागात ग्रंथालय स्थापन करून नवयुवकांना वाचनाची आवड निर्माण करूण ग्रंथ, वर्तमान पत्राचे वाचन करण्याचे आवाहन केले.ग्रंथालयाची प्रगती बघुन संचालक मंडळाचे अभिनंदन करीत मदत करण्याचे आश्वासन दिले.के.के.डोंगरे यांनी प्रत्येक व्यक्तीनी ग्रंथांचे वाचन करणे काळाची गरज आहे.प्रत्येक थोर पुरुषांच्या ग्रंथाच्या वाचनामुळे माणसाची प्रगती करता येते असे सांगितले.जगदीश येरोला यांनीही विचार व्यक्त केले.प्रास्ताविक संस्थेचे संस्थापक सचिव ग्रंथमित्र वाय.डी.चौरागडे यांनी ग्रंथालयाचे मागील ४१ वर्षातील प्रगती अहवाल सादर करून ग्रंथालयातील ग्रंथांचे जास्तीत जास्त नागरिकांनी वाचन करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे संचालन कोषाध्यक्ष डी.आर.चौरागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सदस्य जे.जे.पटले यांनी मानले.कार्यक्रमाला नरेंद्र कुमार चौरागडे,दुर्गेश चेचाने, मुकेश बिजेवार,आशा चेचाने,कुल्लु वरखडे आदींनी सहकार्य केले.