
अर्जुनी मोरगाव,दि.08ः- आपल्या घराशेजारील परिसर स्वच्छ ठेवल्यास आपल्या आरोग्यासाठी हितकारक असून अस्वच्छता ही वेगवेगळ्या रोगराईस निमंत्रण देते.त्यामुळे गाव आणि आपला परिसर स्वच्छ ठेवूनले आरोग्य उत्तम राखण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी स्वच्छता ठेवणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य जयश्री देशमुख यांनी केले.त्या महागाव येथे स्वच्छता पंधरवडानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या. दि.2/10/2022 ला ग्रामपंचायत महागाव येथे स्वच्छता ही सेवा आणि महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती निमित्त जि.प.सदस्य जयश्री देशमुख,प.स.सदस्य प्रमोद लांडगे,सरपंच प्रभारकर कोवे,उपसरपंच चंद्रभान पुस्तोडे,पोलीस पाटील,गटसमन्यवक अंबुले, प्रा.आ.केंद्र वैद्यकीय अधिकारी रुखमोडे,सर्व अंगणवाडी सेविका,आशा सेविका, अंगणवाडी मदतनीस, स्वच्छता गृही,गावकरी,तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक श्री अंबुले यांनी केले.