देवरी येथे दमा आजारावर औषध वितरण शिबीर संपन्न

0
33

देवरी,दि.09 – कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत स्थानिक धुकेश्वरी मंदिर समिती, सुवर्णप्राशन फाऊंडेशन आणि दिनबंधू ग्रामीण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दमा सारख्या आजारावर मोफत औषधी वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, सुमारे सव्वा तीनशेवर रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

स्थानिक माँ धुकेश्वरी मंदिर सभागृहात सुआयोजित या शिबिरात दमा, जुनाट सर्दी अस्थमा अशआ प्रकारचे आजार बरे होण्यासाठी आणि समाजात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार होण्यासाठी आयुर्वेदिक औषध वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रुग्णांचा उत्सुर्फ प्रतिसाद मिळाला असून जिल्हयांतर्गत आणि आंतरजिल्ह्यातील जवळपास ३२७ रुग्ण सहभागी झाले  होते. आयुर्वेदाचार्य सुनील समरीत आणि डॉ.रुपेश परशुरामकर यांनी रुग्णांची चिकित्सा करून २२७ रुग्णांना दमा या आजाराच्या औषधी चे मोफत वितरण माँ धुकेश्वरी मंदिर समितीचे अध्यक्ष ॲड.प्रशांत संगिडवार, प्रतिष्ठित नागरिक बंसीलाल बंग, सुवर्णप्राशन फाउंडेशन चे संस्थापकअध्यक्ष आयुर्वेदाचार्य सुनील समरीत,बिरसा ब्रिगेडचे संघटक चेतन उईके,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष कुलदिप लांजेवार,शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष विनोद चौधरी, सुवर्णप्राशनचे सचिव डॉ.रुपेश परशुरामकर,विश्वस्त प्रा.दिलीप बोरकर,दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे सहसचिव प्रशांत सावलकर यांचे हस्ते वितरण करण्यात आले.

शिबिराच्या आयोजनासाठी सुवर्णप्राशन फाऊंडेशनच्या सहसचिव हितेश्री समरीत, दिनबंधु ग्रामीण विकास संस्थेचे सचिव कल्याणी लांजेवार,विश्वस्त दिपक लांजेवार,शिक्षक संघटनेचे दुधराम कुंभरे,रंजीत धमगाये,तपेश काशिवार,सुरेश सरोटे, हर्षवर्धन मेश्राम यांच्या सह मंदिर समिती आणि दोन्ही सामाजिक संस्थेच्या विश्वस्त आणि स्वयंसेवकांनी सहकार्य केले.