
कोजागिरी उत्सव थाटात, गुणवंताचा सत्कार
गोंदिया : समाजात विविध घटकांचा वास असतो. त्यातच शेतकरी व इतर वर्गाच्या विकासासाठी सामूहिक प्रयत्न झाल्यास त्याचे चांगले परिणाम समोर येतात. शिवाय समाजाच्या प्रगतीसाठी संघटन शक्ती आवश्यक आहे. अशा सर्व बाबींचा विचार केल्यास विकासासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे मत जि.प.सभापती संजयसिंह टेंभरे यांनी व्यक्त केले. ते स्थानिक पोवार सांस्कृतिक भवनात आयोजित कोजागिरी पौर्णिमा उत्सवानिमित्त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
स्थानिक पोवार सांस्कृतिक भवन येथे पवार प्रगतीशील मंच तथा नवयुवक समितीच्या वतीने कोजागिरी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलतांना टेंभरे यांनी शेतकरी आज व उद्याचा यावर प्रकाश टाकले. तसेच समाजातील मोठा वर्ग हा शेतीशी निगडीत आहे, तेव्हा या वर्गाचेही सन्मान व्हावे, असे सांगत समाजाच्या प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहणार, असेही आश्वासन त्यांनी दिली. आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून संजयसिंह टेंभरे, पंवार प्रगतीशील मंचचे अध्यक्ष अॅड. पृथ्वीराज चव्हाण, पंवार प्रगतीशील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुरेश भक्तवर्ती, गोंदिया पं.स.सभापती मुनेश रहांगडाले, तिरोडा पं.स.सभापती कुंताताई पटले, देवरी पं.स. उपसभापती अनिल बिसेन, नवयुवक समितीचे अध्यक्ष योगी येडे, महिला समितीचे अध्यक्ष मनिषा गौतम उपस्थित होते. आयोजित कार्यक्रमात समाजातील पीएचडी धारक तसेच नीट, एमएचसीईटी, गेट यासह शैक्षणिक व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे पार्श्चभूमि अॅड. चव्हाण यांनी मांडली. तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रिती गौतम तर आभार उपाध्यक्ष पन्नालाल ठाकरे यांनी मानले.