35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ 350 जणांनी घेतला शिबिराचा लाभ;शिवसेनेतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

350 जणांनी घेतला शिबिराचा लाभ;शिवसेनेतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन

0
34

blank

गोंदिया : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गोंदियातर्फे शहरातील भीमनगर मैदानात रविवारी (ता.16) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा 350 च्या जवळपास नागरिकांनी लाभ घेतला.
शिबिराचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख पंकज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरात हृदय तपासणी, ब्लड प्रेशर, दात, नाक, कान, घसा तपासणी, अस्थिरोग, स्त्रीरोग, त्वचा, नेत्र तपासणी व जनरल तपासणी करण्यात आली. यावेळी सहयोग हॉस्पिटलचे डॉ. महेश कावळे, डॉ. प्रशांत नागरे, डॉ. पल्लवी गोडेश्वर, डॉ. मनिष दमाहे, डॉ. प्रशांत ठाकूर, बाहेकर हॉस्पिटलच्या डॉ. जया येदूवार, केटीएस रुग्णालयाचे डॉ. सराली लोखंडे, डॉ. प्रणिता जुक्टे, डॉ. स्वाती सतदेवे यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात 350 च्या जवळपास नागरिकांनी सहभाग घेऊन आपली तपासणी करवून घेतली