जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उदघाटन

0
23

वाशिम, दि. 04  : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम येथे आज 4 नोव्हेंबर रोजी दिवाळी अंक – 2022 प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोलते, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह प्रभाकर घुगे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातील वरिष्ठ लिपीक ग.भि. बेंद्र, कनिष्ठ लिपीक संतोष कंडारकर व विलास कांबळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांनी दिवाळी अंकाचे अवलोकन केले.

         दिवाळी अंक प्रदर्शनामध्ये श्री. दिपलक्ष्मी, आवाज, श्री व सौ, साधना, ललित, शिवतेज, ॲग्रोवन, लोकसत्ता, जत्रा, ग्राहक हित, लोकमत दिपोत्सव, मुक्त शब्द, मौज, संवाद सेतू, वन औषधी, घरचा वैद्य, प्रतिबिंब यास‍ह अनेक अंक या प्रदर्शनात लावण्यात आले आहे.  यावेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विशाल सुर्वे, अतिष लबडे, छोटी प्यारेवाले, शुभम कांबळे, जगदेव राऊत, नंदकिशोर राऊत, तुषार खंडारे, प्राची जाधव, पुजा जाधव, मनिषा जाधव, कविता खिल्लारे, सुनिता धुर्वे, प्रिया कल्ले, प्रशांत वैद्य, आकाश खडसे व दंडे यांच्यासह स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे अन्य विद्यार्थी व विद्यार्थीनी यांची उपस्थिती होती.