कर्मचारी महासंघाच्यावतीने सेवानिवृत्त कर्मचाèयांचा सत्कार

0
10

गोंदिया,दि२९- महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीमध्ये असलेल्या कार्यालयात गेल्या काही दिवसात सेवानिवृत्त झालेल्या १२ कर्मचाèयांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोरवाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे टी.टी.वाढई होते.तर उदघाटक म्हणून म.रा.जि.प.कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष व विभागीय महासचिव पी.जी.शहारे होते.यावेळी नामदेव मेश्राम,बी.डी नेवारे,प्रफुल धमगाये,गौतम सरकार,गायगये,मोहन पुरी,नशीने,गिरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कार्यरत राहिलेल्या १२ सेवानिवृत कर्मचाèयांचा शाल श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आभार जिल्हा कार्याध्यक्ष प्रफुल धमगाये यानी मानले.तर संचालन लिलाधर तिबुडे यांनी केले.