कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांना बंद करण्याचा निर्णय चुकीचा : बोपचे

0
21

गोरेगाव-महाराष्ट्र शासनाने २0 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांना बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून यामुळे जिल्ह्यातील बहुतेक विद्यार्थी, पालक व शाळांना याचा फटका बसणार आहे, शासनाने घेतलेला निर्णय शिक्षणाचा अधिकार व गदा आणणारा आहे. यामुळे जि.प.अध्यक्षचे यांनी पुढाकार घेत शासन निर्णय विरुद्ध जि.प. च्या माध्यमातून ठराव संमत करत विरोध दर्शवावा व जिल्ह्यातील बंद होणार्‍या शाळांना संरक्षण प्रदान करण्यात यावे, असे मनोगत युवानेता रविकांत खुशाल बोपचे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील सोनी येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित दुय्यम शायरी कार्यक्रमाचे उद्धघाटन करताना रविकांत बोपचे बोलत होते. याप्रसंगी जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले, सभापती मनोज बोपचे, ओमप्रकाश कटरे, किशोर पारधी, भोजराज कुरुंजेकर, सरपंच हेमेश्‍वरीताई हरिनखेडे, ललीताताई पुंडे, उषाताई वालथरे, कैलास बिसेन, श्रीकृष्ण गौतम, कृष्णगोपाल पटले, पंकज चौहान, घनश्याम पारधी, चंद्रसेन फुंडे, रामकृष्ण बारेवार, दिलीप बोपचे, प्रकाश बघेले, सुरेश टेंभरे, संजय पटले, हनुमान बोपचे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सोनी येथील रहिवासी संगम खिलेश्‍वर बोपचे यांचा हृदय विकाराच्या धक्काने निधन झाले. त्यांना र्शध्दांजली वाहण्यात आली. दरम्यान रविकांत बोपचे पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असतांना खासदार प्रफुल पटेल यांनी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचे विकेंद्रीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. ज्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळाला. मात्र वर्तमान सरकारने त्या निर्णयाला मागे घेत शेतकर्?यांना त्रास देण्याचा प्रयत्न केले आहे. एकीकडे शिंदे- फडणवीस सरकार शेतकर्‍यांची सरकार असल्याचे भासवत असते मात्र शेतकरी विरोधी निर्णय घेत शेतकर्‍यांना डावळण्यात येत आहे. हा आता शेतकर्‍यांना समजले असून वेळीच बळीराजा त्यांना धडा शिकवणार आहे, असेही व्यक्त केले.