▪️जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 40 परीक्षा केंद्रांवर हजारो स्पर्धक घेणार भाग.
गोंदिया- संविधान मैत्री संघ व सर्वसमाज मित्र संघटना आणि विविध शाळा महाविद्यालय प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान प्रस्तावना, संविधानात दिलेले मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्ये, महिला सुरक्षा हक्क आणि बाल संरक्षण कायदा इ. प्राथमिक माहिती विषयावर जिल्हास्तरीय ‘संविधान गौरव स्पर्धा परीक्षा’ रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्ह्यातील 8 तालुक्यांतील 40 परीक्षा केंद्रांवर घेण्यात येत आहेत. ज्यामध्ये 5000 स्पर्धकांचा सहभाग अपेक्षित आहे.
जिल्ह्यात प्रथमच एकाच दिवशी, एकाच वेळी भव्य स्तरावर आयोजित करण्यात आलेल्या या संविधान गौरव स्पर्धा परीक्षेच्या समिती प्रमुख प्रमुख जिल्हा समन्वयक, प्रा.डॉ. दिशा गेडाम यांनी या ज्ञानवर्धिनी परीक्षेत जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व महिलांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले व परीक्षेची माहिती देताना सांगितले की, संविधानाला 72 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त 72 प्रश्न दिले जाणार असून प्रत्येकी 1 गुण प्रमाणे 60 प्रश्न वस्तुनिष्ठ आहेत, 10 प्रश्न वर्णनात्मक (प्रत्येकी 3 गुण), 2 प्रश्न वर्णनात्मक (प्रत्येकी 5 गुण) वर्णनात्मक प्रश्नांना पर्याय दिले जाणार नाहीत ऐसे 100 गुणाचे प्रश्नपत्र राहणार आहे. परीक्षा केंद्रावर प्रवेशाची वेळ सकाळी 11:00 वाजता आणि परीक्षा सुरू होण्याची वेळ दुपारी 12:00 ते 2:00 अशी एकूण 2 तासांची वेळ देण्यात आली आहे. भाषा हिंदी आणि मराठी असेल. प्रत्येक तालुक्यात दोन गट असतील – कनिष्ठ गट – विद्यार्थी (18 वर्षांपर्यंत) आणि वरिष्ठ गट – महिला / पुरुष (18 वर्षांपेक्षा जास्त), बक्षीस रक्कम प्रथम 2000/-, द्वितीय 1500/-, तृतीय 1000/ – प्रत्येक तालुक्यासाठी अशा प्रकारे 8 तालुक्यांत एकूण 72 हजार रुपये रोख व 72 प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. बक्षीस वितरण 27 नोव्हेंबर 2022 रोजी समाज कल्याण अधिकारी कार्यालय, गोंदिया येथे होणार आहे. नोंदणीची अंतिम तारीख 16 नोव्हेंबर 2022 आहे. अतुल सतदेवे 9370415505, जे.के. लोखंडे 9422975744, आदेश गणवीर सर 9049292451 यांच्याशी संपर्क साधता येईल व स्थानिक नोंदणीसाठी परीक्षा केंद्र व केंद्रप्रमुख तहसील निहाय गोंदिया तहसिल- MG पैरामेडिकल कॉलेज मुर्री रेल्वे चौकी, गोंदिया (अनिल गोंडाने), जेएम हाइस्कूल & जूनियर कॉलेज कन्हारटोली गोंदिया (प्रा.एमजी दस्तगीर, प्रा. रोमेंद्र बोरकर), संत ज्ञानेश्वर हायस्कूल जूनि. कॉलेज, ग्राम-दतोरा ( प्रा.के एस कोरे) , जीईएस हाइस्कूल & जूनियर कॉलेज दासगांव प्रा.प्रेम बसिने, एस एस गर्ल्स कॉलेज, गोंदिया शहर प्रा.डॉ. दिशा गेडाम , सुदामा हायस्कूल & जूनियर कॉलेज, नागरा प्रिंसिपल ठाकुर मैडम, नितिन कुंडभरे, नूतन विद्यालय मुख्या.यशवन्त बोरकर, एस एस एस कोचिंग क्लासेस सिविल लाइन, संजय शेंडे देवरी तहसिल- मनोहरभाई पटेल जूनियर कॉलेज, देवरी प्रा. प्रदीप रामटेके, आनंद सतदेवे, श्रीमती के एस जैन महाविद्यालय देवरी प्रा.एल.एस.सोनेवाणे, सुभाष हाइस्कूल, डोंगरगांव (सावली) विनायक येडेवार श्रीराम विद्यालय व जूनियर कॉलेज, चिचगढ़ प्रा. सुनील वाघमारे, डॉ बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरतोली/लोहारा प्रा. किशोर मेंढे, प्रिन्सिपॉल प्रा. जवादे मॅडम, श्रीमती आर.एस.अग्रवाल जूनियर कॉलेज, ककोडी, एम.एस.रहांगडाले, लोणारे सर, आमगांव तहसिल- विद्या निकेतन कान्वेंट, आमगांव मुकेश उजवने , सावन कटरे, श्री तुकाराम हायस्कूल व जूनियर कॉलेज, भोसा मनोज मेश्राम, क्रांति ब्राम्हणकर, जिल्हा परिषद वरि.प्रा.शाळा/ हायस्कूल,तिगांव सुरेंद्र मेंढे सर गोरेगाव तहसिल आदिलोक बीएड महाविद्यालय, गोरेगाव प्रा.विनोद उके, प्रा. बी के शरणागत, श्रीमती चंचलबेन मनिभाई पटेल हायस्कूल व जूनियर कॉलेज, ग्राम गीधाड़ी प्रा.टी.जी.कोडापे, प्रा. सचिन नांदगाये , माउंट कॉमेट पब्लिक स्कूल, गोरेगाव अरुण चन्ने, संजय गांधी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तेढा ता गोरेगाव प्रा. सुशांत बी गोस्वामी, पवन कटरे, नंदेश्वर सर, अर्जुनी मोरगाँव तहसिल- बहुद्देशीय हायस्कूल, अर्जुनी मोरगाँव अश्विनी भावे, सुनीताताई हूमे (मुख्या.), एस एस जे कॉलेज, अर्जुनी मोरगाँव, भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालय पिंपळगांव(खांबी) आर.के.मेश्राम, पुगलिया महाविद्यालय, नवेगांव बांध रामदास बोरकर, एन बी गजभिये, जवाहर नवोदय विद्यालय नवेगांव बांध देवानंद थूल सर (प्रिंसिपल) सड़क अर्जुनी तहसिल- राजीव गांधी महाविद्यालय, सड़क अर्जुनी डॉ.अनिल गायकवाड़ प्रा. देशमुख मैडम, एस चंद्रा महाविद्यालय सड़क अर्जुनी संतोष रामटेके , समीर महाजन, एम बी पटेल महाविद्यालय सड़क अर्जुनी बिसेन सर, वाघ मैडम, अनुसूचित जाती मुलिंची निवासी शाळा डव्वा पळसगाव मुन्नाभाई नंदागवली सर सालेकसा तहसिल -मनोहरभाई पटेल महाविद्यालय सालेकसा प्रा.अश्विन खांडेकर , प्रा. साखरे, मनोज डोये, पंचशील हाइस्कूल व जूनियर कॉलेज, मक्काटोला,नंदेश्वर सर, बैरी.राजाभाऊ कला वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, साकरीटोला प्रा.सागर काटेखाये (प्रिंसीपल), आदिवासीं उज्ज्वला विद्यालय, बिजेपार, मुख्या. शीतल आर.अंबादे, मिलिंद गणवीर तिरोडा तहसिल -सिद्धार्थ हायस्कूल व जूनियर कॉलेज, ठाणेगाव प्रा. सुरेश बंसोड़, जिल्हा परिषद शाळा, तिरोडा प्रा.धम्मपाल गजभिये, गि.कन्या हाय.व कनिष्ठ महा.तिरोडा प्रा.डाकेश्वर उपराडे, शहीद मिश्रा हाय.व कनिष्ठ महा. तिरोडा प्रा.प्रमोद जांभूळकर, सुभाष विद्यालय & जूनियर कॉलेज मुंडिकोटा प्रा.एन.ए.नागदेवे (प्रिंसीपल) ,राजू चामट यांच्याशी संपर्क केला जाऊ शकतो.