“न्यूमोनिया “सर्वात मोठा संसर्गजन्य विकार – डॉ. नितीन वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी

0
16
12 नोव्हेंबर- जागतिक न्यूमोनिया दिवस निमित्ताने

 गोंदिया- न्यूमोनिया हा जगातील सर्वात मोठा संसर्गजन्य विकार आहे. या करिता 12 नोव्हेंबर हा दिवस न्यूमोनियाविषयी जागरुकता करण्यासाठी जागतिक न्यूमोनिया दिन म्हणून पाळला जातो. सार्वजनिक आरोग्य समस्या दूर करण्यासाठी तसेच न्यूमोनियाचे गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी आणि रोगाशी लढण्यासाठी मार्ग शोधण्यासाठी त्याचबरोबर अधिक संस्था/देशांना प्रोत्साहित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असल्याची माहिती डॉ. नितीन वानखेडे यांनी ह्या वेळी दिली.
संयुक्त राष्ट्रांनी (UN) 12 नोव्हेंबर 2009 रोजी पहिला जागतिक न्यूमोनिया दिवस जगभरात साजरा केला. दरवर्षी 100 हून अधिक संस्था एकत्र येऊन “बाल न्यूमोनिया विरुद्ध ग्लोबल युती” तयार करतात आणि न्यूमोनियाशी संबंधित मृत्यूंबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करतात. जागतिक आरोग्य संघटना (WHO) युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) ने न्यूमोनिया आणि डायरियाबद्दल जागतिक जागरूकता निर्माण करण्यासाठी कृती योजना जाहीर केली होती.
लहान मुलांमध्ये न्यूमोनियाच्या प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक सुरक्षित उपाय आहे. त्याशिवाय नवजात बालकांना पहिल्या सहा महिन्यांपर्यंत मातेने स्तनपान देणे, लहान मुलांच्या संपर्कात धूम्रपान टाळणे, तसेच मुलांना पोषक आहारासह प्रदूषण नसलेल्या मोकळ्या हवेत नेणे, याद्वारेही बालकांना होणारा न्यूमोनिया टाळण्यासाठी मदत होत असल्याची माहिती डॉ.दिनेश सुतार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी ह्या वेळी दिली.
जास्तीत जास्त बालकांमध्ये न्यूमोनिया हा प्रत्येक वयोगटासाठी चिंतेचा विषय असतो. एवढेच नाही तर वृद्धांमध्ये न्यूमोनियाची वाढलेली पातळीही घातक ठरू शकते. न्यूमोनिया एक कारण म्हणजे प्रदूषणाची वाढती पातळी. यामुळे निमोनिया होण्याचा धोका वाढतो. निमोनिया झाल्यानंतर फुफ्फुसांवर वाईट परिणाम होतो. लहान बालके आणि वृद्धांना याचा धोका सर्वात जास्त होत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी सांगितले.
संसर्गामुळे फुफ्फुसावर सूज येते, ज्याला न्यूमोनिया म्हणतात. निमोनिया जीवाणूंच्या संसर्गामुळे होतो. इन्फ्लूएंझा किंवा कोविड-19  सारख्या विषाणूजन्य संसर्गामुळे फुफ्फुसांवरही परिणाम होऊ शकतो आणि गंभीर नुकसान होऊ शकते. व्हायरल आणि बॅक्टेरियल दोन्हीही कारणांमुळे होणाऱ्या निमोनियाला संक्रामक मानले जाते. हे संक्रमित व्यक्तीच्या शिंकणे किंवा खोकल्याच्या ड्रॉपलेटने एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतात.
न्यूमोनिया आजाराची प्रमुख लक्षणे कोणती आहेत?
न्यूमोनिया झाल्यास ताप येतो किंवा खालील लक्षणे जाणवतात. सतत खोकला येणे हे न्यूमोनिया आजाराचे प्रमुख लक्षण आहे.

  • खोकल्यातून बेडका पडतो.
  • खोकल्यासोबत हिरवा, पिवळा किंवा लाल कफ येणे.
  • न्यूमोनिया हा व्यक्ती हा अशक्त आणि थकलेला दिसतो.
  • न्यूमोनिया झालेल्या रुग्णाला खोकला, ताप आणि घाम सोबतच थंडी मोठ्या प्रमाणावर जाणवते.
  • ओठ आणि नखांचा रंग निळा होणे.
  • श्वास घेताना त्रास होणे किंवा जलद श्वासोच्छवास.
  • हृदयाचे ठोके वाढणे.
  • श्वास घेताना त्रास होणे किंवा जलद श्वासोच्छवास.
  • प्रचंड डोकेदुखी आणि अस्वस्थताही जाणवते.

न्यूमोनिया हा आजार झाला तर त्याच्या शरीरावर काय परिणाम होतो?
न्यूमोनिया या आजारात प्रामुख्याने फुफ्फुसाला सूज  येते. काही वेळा फुफ्फुसात पाणीही भरले जाते. योग्य वेळीच लक्षणे पाहून उपचार करणे आवश्यक असते. प्रामुख्याने बॅक्टेरिया , व्हायरस किंवा इतरही अनेक कारणांमुळे हा आजार होतो.
न्यूमोनियाचे मुख्य प्रकार
1) बॅक्टीरियल न्यूमोनिया
2) व्हायरल न्यूमोनिया
3) माइकोप्लाज्मा न्यूमोनिया
4) एस्पिरेशन न्यूमोनिया
5) फंगल न्यूमोनिया
या लोकांना न्यूमोनियाचा धोका अधिक

  • लहान मुलं आणि वृद्धांना न्यूमोनियाचा धोका अधिक असतो.
  • धूम्रपान करणाऱ्या लोकांमध्ये न्यूमोनियाचा धोका जास्त असतो.
  • हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या लोकांना धोका अधिक.
  • व्हेंटिलेटरवर असणाऱ्या लोकांना न्यूमोनियाचा धोका अधिक.

असा करावा बचाव

  • स्मोकिंग करणे बंद करा. कारण यामुळे श्वसन संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते.
  • हात नेहमी साबणाने स्वच्छ धुवा.
  • खोकलताना आणि शिंकताना तोंड आणि नाक झाकून ठेवा. टिश्यूला तत्काळ डिस्पोज करा.
  • इम्यूनिटी चांगली ठेवण्यासाठी परिपूर्ण आराम करा. संतुलित आहार घ्या.
  • नियमित व्यायाम करा.

ही न्यूमोनियाची मुख्य कारणे आहेत –
फुफ्फुसातील जिवाणू संसर्गामुळे न्यूमोनिया होतो. ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती खूप कमकुवत आहे अशा लोकांना हा आजार जास्त प्रमाणात होतो. अनेक प्रकारच्या जंतूंमुळे न्यूमोनिया होऊ शकतो. आपण श्वास घेतो त्या वातावरणात अनेक प्रकारचे जंतू असतात आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला या जंतूंच्या संसर्गापासून वाचवते. परंतु, काहीवेळा हे जंतू आपल्या रोगप्रतिकारक शक्तीचाही पराभव करतात आणि फुफ्फुसात संसर्ग पसरवण्यास सुरुवात करतात.