अर्जुनी मोरगाव,दि.13ः जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा सभापती शिक्षण क्रीडा व आरोग्य इंजि.यशवंत गणविर हे तालुक्याच्या दौऱ्यावर असताना वडेगाव स्टेशन येथील सुनिल बुराडे यांच्या माध्यमातून गावात तीन अनाथ भावंडे असल्याची माहिती मिळाली.त्या माहितीच्या आधारे जि.प.उपाध्यक्ष इंजि.गणविर यांनी त्या तीन अनाथ भावंडांचे घर गाठले.पोहचल्यानंतर मन सुन्न करणारे ते दृश्य,अवघे दहा वर्षे वय असलेली मोठी बहिण मुस्कान आपल्या भावंडांना साभाळत संसाराशी भांडत आहे.धाकटी बहिण प्रिया वय ८ व भाऊ अर्जुन वय ६,यांना आपल्या म्हातारी आजीच्या मदतीने त्यांना सांभाळत आहे.पाच वर्षांपूर्वी वडील वारले व चार वर्षांपूर्वी आई आपल्या पोटच्या गोळ्यांना सोडुन गेली.ती तीनही मुले पोरकी झाली.उपाध्यक्षानी त्या मुलांशी हितगुज साधले.त्यांची विचारपुस केली.रेशन दुकानातील मिळणाऱ्या धान्यावर आपली पोटाची खळगी भरतात.खेळण्याच्या वयात ती मुलं संसार मांडुन जीवन जगत आहेत हे पाहून अश्रु त्या भावंडांना ३००० हजाराची तात्पुरती आर्थिक मदत केली.व शेजारच्यांना या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासली तर मला लगेच कळवा मी इथे येऊन या मुलांची समस्या सोडविन व शासनाच्या वतीने यांना मदत मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली.