33.7 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी-जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर

हत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित द्यावी-जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर

0
28

blank

अर्जुनी मोरगाव,दि.16ः  गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात हत्तींचा हैदोस सुरु आहे.हत्तींच्या या हैदोसामुळे तालुक्यातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.एवढेच नव्हे तर दिनांक १४/११/२०२२ मौजा जांभळी धान पिकांची नासाडी केली.जमा करुन ठेवलेले धान पिक उद्ध्वस्त केले.हातात आलेले पिक नेस्तनाबूत झाले.
अशातच हि माहिती कळताच जि.प.उपाध्यक्ष इंजि.यशवंत गणविर यांनी मौक्यावर जाऊन पाहणी केली.इतका विनाशक दृश्य ज्या प्रमाणे कापणी केली जाते त्याच प्रकारे भात पिक खाऊन,पायाने तुडवून नासधुस केली.या शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी मौक्यावरुन संपर्क साधला आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजि पं.स.सदस्य दिनदयाल डोंगरवार,माजि जि.प.सदस्य रतिराम राणे,प्रतापगड चे पोलीस पाटील योगेश जनबंधु,गट ग्रामपंचायत बोंडगाव चे उपसरपंच दिलीप तिरपुडे व नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.