
विनोद सुरसावंत/ककोडी,दि.१६- मातृभुमी आणि समाजासाठी आत्मबलीदान करणारे, जल,जमिन आणि उलगुलान नारा देणारे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा हे अंखड मानव जातिसाठी पुजनीय असून त्यांच्या आत्मबलिदानापासून युवकांनी प्रेरणा घ्यावे असे विचार कृषिन्नती शेतकरी प्रोड्यशर कंपनी ककोडीचे अध्यक्ष मनेन्द्र मोहबंशी यांनी व्यक्त केले.ते
क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांचा १४७. व्या जंयती निमीत्त कृषीन्नती शेतकरी प्रोड्युशर कंपन्नी ककोडीच्या सभागृहात कार्यक्रम आयोजित कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाची सुरवात क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला माल्यार्पण करुन करण्यात आली.यावेळी अध्यक्ष मनेन्द्र मोहबंशी, सचिव मनोज मेश्राम,संचालक दिलीप अमरवाडे प्रमुख पाहुणे म्हणून इफकोचे श्री.चव्हान,मोहन साहळा,जितेन्द्र कपुरडेहलिया,ज्ञानदाश साहु,प्रमोद सहाळा, अर्जुन हारने,मदन सोनबोईर उपस्थित होते.