गोंदियात वेस्टा कार्यकारिणीची बैठक

0
33

गोंदिया, ता. १८ ः इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे, शिक्षण संस्था संचालकांचे संघटन विझनरी इंग्लिश मिडीयम ट्रस्टी असोशिएशन अर्थात ‘वेस्टा’ च्या जिल्हा कार्यकारिणीची प्रथम सभा येथील हॉटेल पॅसिफिकमध्ये नुकतीच पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात गुजराती स्कूल गोंदियाचे संस्थापक दीपम पटेल यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आली. यावेळी वेस्टाचे अध्यक्ष म्हणून मुकेश अग्रवाल, उपाध्यक्ष डॉ. नीरज कटकवार, अजय पालिवाल, राजेश गोयल, सहसचिव अनूप बोपचे, कोषाध्यक्ष आशीष अग्रवाल, सहकोषाध्यक्ष नीतेश अग्रवाल, सचिव चेतन बजाज आदींची निवड करण्यात आली. यावेळी शांतीलाल मुथा फाउंडेशनच्या वतीने प्रयम सोगी (पुणे) व सुमीत चौधरी यांनी मूल्यवर्धन आणि नैतिक शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुकेश अग्रवाल यांनी सर्व शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू समजून त्यांच्या विकासाठी वेस्टा सदैव कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.
बैठकीला गुजराती स्कूलचे संस्थापक अजय वडेरा, विवेक मंदिर स्कूलचे संस्थापक दिलीप जैन, अॅड. इंद्रकुमार होतचंदानी, आरटीई फाउंडेशन गोंदियाचे अध्यक्ष आर. डी. कटरे, विजय जोशी, प्रशांत लिल्हारे, एस. एस. कटरे, एस. जी. मेश्राम, विलास नागदेवे, अभिषेक अग्रवाल, पंकज सरोट, भूवन बिसेन, स्वप्निल पारधी, हिमांशू बिसेन, राजेंद्र बडोले, जसराजसिंग भाटिया, सुरेंद्रसिंग सलुजा, राजेश गोयल, संध्या राव प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन चरणसिंग जुनेजा यांनी केले. आभार प्रोग्रेसिव्ह ग्रुप ऑफ स्कूल्सचे संस्थापक डॉ. नीरज कटकवार यांनी मानले.