नियमित लसीकरण विषयक जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा

0
32

गोंदिया-नियमित लसीकरण विषयक जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा जिल्हाधिकारी नयना गुंडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.
सर्वात प्रथम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी नियमित लसीकरण बाबतचे प्रस्तावना सादर केली. जागतिक आरोग्य संघटनेचे नागपुर विभागाचे डॉ. साजिद यांनी त्यात प्रामुख्याने शासकीय संस्थेमध्ये होणारे बालकांचे विविध लसीकरण बाबीचे जिल्ह्याची माहिती समिती समोर सादरीकरण केले.
जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी जिल्ह्यात प्रसुती झाल्यानंतर बालकास जन्मानंतर दिल्यात येणारे बिसिजी, पोलियो व हिपँटायटिस-बी लसीकरण १00 टक्के बालकांना मिळण्याच्या द्रुष्टीकोनातुन सत्रे आयोजित करण्याच्या सुचना या वेळी दिल्या.खाजगी संस्थेत जन्म होणार्या बालकांना सुद्धा वरिल लसिकरण मोफत मिळण्यासाठी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांची समन्वय सभा घेण्याच्या सुचना  केल्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल पाटील यांनी गोवर झ्र रुबेला , पोलिओ बाबत गावपातळीवर जनजाग्रुती करावी. गावात नियमित लसिकरणाचे सत्र नियोजीत वेळेवर केल्यास बालम्रुत्यु, कुपोषण कमी होण्यास मदत होईल. अलीकडे राज्यात मुंबई, भिंवडी व मालेगाव मध्ये काही भागात गोवर विषाणू ससंर्ग काही रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे सुचना या वेळी त्यांनी दिल्या. लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे लसीकरण करुन त्याची माहिती पोर्टलवर नोंदविण्यात यावी.
समितीची सभेला डॉ. नितीन वानखेडे जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. दिनेश सुतार अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. अमरिश मोहबे जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. नितीन कापसे जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. वेदप्रकाश चौरागडे जिल्हा हिवताप अधिकारी, डॉ. निरंजन अग्रवाल जिल्हा साथरोग अधिकारी, कु. अर्चना वानखेडे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, डॉ.रोशन राऊत अतिरिक्त संचालक कुष्ठरोग, डॉ.सुशांकी कापसे जिल्हा साथरोग तज्ञ ,सर्व तालुका आरोग्य अधिकारी , सर्व ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे वैद्यकीय अधीक्षक उपस्थित होते.
सर्वात शेवटी मा. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात आरोग्य विषयक ज्या इंडिकेटर मध्ये कमी पडत आहोत ते सुधारणा करून लोकांना आरोग्य विषयक चांगल्या सोयी व सुविधा देण्याच्या सूचना केल्या.