35.9 C
Gondiā
Saturday, June 13, 2026
Home विदर्भ श्री योग साधना केंद्राची नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी घोषित  

श्री योग साधना केंद्राची नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणी घोषित  

0
20

नागपूर, दि.२८ -: येथील रमना मारोती परिसरातील श्री योग साधना केंद्राची नवनिर्वाचित केंद्रीय कार्यकारिणीची निवड घोषित करण्यात आली आहे.अध्यक्ष पदी अॅड. नागेश दांडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी अॅड. गंगाधर वैद्य आणि शंकर जांभुळकर यांची वर्णी लागलेली आहे . महामंत्री पदी डॉ. गंगाधर कडू यांना निवडण्यात आले असून त्यांच्या सोबत कृष्णराव इंगोले आणि छगन ढोबळे हे सहमंत्री म्हणून साथ देतील. कोषाध्यक्ष पदी प्रकाश वाडे यांची निवड करण्यात आली आहे. सदस्यपदी डॉ.प्रभाकर मस्के, अॅड.जगदीश गायधने , प्रभाकर खेडकर, सतीश भुरले, भोजराज भोयर , धर्मेंद्र मसूरकर , प्रभाकर देवते आणि श्रीमती सुमन इंद्रजित मान यांची निवड झालेली आहे असे संस्थेचे उपाध्यक्ष शंकर  जांभुळकर यांनी कळविले आहे