7 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ- धान खरेदीसाठी ऑनलाईन नोंदी पूर्ण करा- एम. व्ही. बाजपेयी

0
20

 गोंदिया दि. 01: शासकीय आधारभूत  धान  खरेदी  योजनेअंतर्गत पणन हंगाम 2022-23 मधील धान खरेदी करिता एन ई एम एल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करिता 07 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व धान उत्पादन शेतकऱ्यांनी तालुक्यातील  नजीकच्या आधारभूत धाना खरेदी केंद्रावर स्वत:चे प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी  एम. व्ही. बाजपेयी  यांनी  केली आहे.

 चालु हंगामाचे 7/12 उतारा, अधाराकार्ड, बँक पासबुक व मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे सादर करून 07 डिसेंबर 2022 पर्यंत खरीप हंगामातील  धान  खरेदी करिता ऑनलाईन नोंदी पूर्ण करून घ्यावी व शासनाच्या धान खरेदी योजनेचा लाभ घ्यावा. तसेच कोणत्याही शेतकऱ्यांनी जनधन योजनेचे खाते, संयुक्त बँक खाते नोंदणी  करताना  देवु  नये असे आवाहनही  त्यांनी केले.