शहरातून होणारी अवैध जड वाहतूक बंद करा

0
22

..विविध सामाजिक संघटनांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन..
अर्जुनी मोरगाव,-अर्जुनी शहर तालुक्याचे ठिकाण आहे.शहरात शासकीय,निमशासकीय कार्यालये,विविध शैक्षणिक संस्था आणि व्यापारी प्रतिष्ठाने आहेत.शहरात मोठ्याप्रमाणात वर्दळ असते.रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत असते.रायपूर-नागपूर ला जाणारे निर्माणाधिन अर्धनिर्मित विविध प्रकारच्या वाहनांची रीघ लागते.दिवसभर ही वाहने शहरातून धावतात.यामुळे वाहतूक व्यवस्था बाधित होते.3 डिसेंबरला शहरातील इसम या अवैध वाहतुकीचा बळी ठरला.ही अवैध वाहतूक नागरिकांसाठी डोकेदुखी आहे.शहरातून होणारी ही अवैध वाहतूक बंद करण्यात यावी यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी पुढाकार घेत मुख्याधिकारी शिल्पाराणी जाधव यांना बुधवारला(14) निवेदन दिले.
या अवैध वाहतुकीबद्दल नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे.सदर अवैध वाहतूक ही कोहमारा -नागपूर असी न होता कोहमाऱ्यावरून अर्जुनी मार्गे वळविली जाते. वाहन चालक टोलनाके चुकविण्याच्या मोहापोटी या मार्गे वाहने वळवितात. परिणामी शहरातून भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनामुळे अपघातांची शक्यता बळावली आहे.वाहनाच्या गतीबरोबर वाहनांची संख्या पण जास्त असते.एका मागून एक अशी दहा-बाराच्या संख्येने ही वाहने सलग जातात.शहरातील अनेक शाळा सकाळच्या पाळीत भरतात.लहान मोठे विद्यार्थी याच मार्गाने शाळेमध्ये येजा करतात.याच दरम्यान मॉर्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या पण भरपूर असते.सदर वाहन चालक पोलिसांची नजर चुकविण्याच्या नादात भरधाव वेगाणे वाहने हाकतात.याच प्रकारामुळे 3 डिसेंबरच्या सकाळी साडे सहा वाजताच्या दुर्घटनेत एकाला जीव गमवावा लागला.संविधान चौक आणि तावशी टीपॉईंट या ठिकाणी बॅरिगेट आणि सूचनाफलक लावून या अवैध जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात यावा.ही वाहने तावशी बायपास मार्गे वळविण्यात यावी,या मागणीचे निवेदन तालुका माहेश्वरी संघटन,क्रांतिवीर बिरसा मुंडा सेवा समिती,बाळासाहेबांची शिवसेना,तालुका वैद्यकीय संघटना आणि कुणबी समाज बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने प्रशासकीय अधिकारी स्वाती तायडे,लेखापाल प्रफुल्ल गाडबेल मार्फत मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले.यावेळी अरुण कुमार भैय्या,मदनलाल चांडक, कमल भुतडा,भगवानदास पनपालिया,मुरारी पंधरे,अश्विनसिंह गौतम,गिरीश बागडे,देविदास ब्राम्हणकर, होमेन्द्र कठाने,डॉ.दीपक रहिले,डॉ.उल्हास गाडेगोणे उपस्थित होते.