कोरोनाचा नवीन व्हेरियंट परत आलाय…. नागरिकांनो पंचसुत्रीचे पालन करा

0
24

– यशवंत गणवीर, आरोग्य व शिक्षण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया
गोंदिया-चीन,जपान , रशिया, ब्राझिल , कोरिया या देशात कोरोनाचा नवीन व्हेरियंटने उद्रेक सुरु केला असुन त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या द्रुष्टीने आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी सर्व राज्यांना पत्र पाठवुन आवश्यक पावले उचालण्याचे आदेश देण्यात आले आहे.तरी गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विभाग सज्ज होत असुन जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यशवंत गणवीर यांनी नागरिकांना पंचसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोविड सद्रुश लक्षणे असलेल्या लोकांनी कोरोनाची तपासणी करणे, सहवासितांचे शोध घेवुन तपासणी, कोविड प्रतिबंधात्मक दोन्हो डोज पाठोपाठ बुस्टर डोज व त्या सोबत कोविड वर्तणूक बदलाचे नियम पाळणे असे  पंचसुत्रीचे पालन  करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सर्व नागरिक कोरोनाच्या मागील इतिहास विसरून मंदिरात, सार्वजनिक ठिकाणी जसे रस्ते ,बाजार ,दुकान, हॉटेल, रेल्वे स्टेशन ,बस स्टॅन्ड ,जिकडे तिकडे गर्दी दिसत आहे. जिल्ह्यात कोरोना सदृश तीव्र व अति तीव्र श्वसन लक्षणे असलेले लोक बिनधास्तपणे गर्दीत फिरत आहे.
नागरिकांनी नियम पाळावे. कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास तपासणी करणे हाच संसर्ग रोखण्याचा उपाय आहे.तसेच नागरिकांनी लवकरात लवकर विहित अंतरातील दोन्ही लसिकरण डोज व शेवटचा प्रिकॉशनरी बुस्टर डोज पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.
नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क, सुरक्षित दोन फुटाचे सामाजिक अंतर, नियमित हात वारंवार स्वच्छ धुणे, सार्वजनिक ठिकाणी इतरत्र कुठेही न थुंकणे,शिंकताना व खोकताना रुमालाचा वापर करणे हे कोविड वर्तणूक बदलाचे नियम पाळण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करून घेणे, गर्दी टाळणे व नियम पाळणे हे स्वयंफुरतीने केले तरच संसर्ग आटोक्यात येऊ शकतो. जिल्ह्यात बाहेरून येणारे परदेशातील, परराज्यातील लोकांनी  सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी वा इतर कोणतीही लक्षणे दिसल्यास कोरोना टेस्टिंग करून घ्या व उपचारही घ्या असे आवाहन डॉ. नितीन वानखेडे  जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी केले आहे.
बाधीतांचे प्रमाण रोखण्यासाठी नियमांचे पालन व लसीकरण महत्त्वाचे असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमरिश मोहबे यांनी आवाहन केले आहे.