Home विदर्भ मराठा सेवा संघ गोंदिया जिल्ह्याची कार्यकारणी घोषित

मराठा सेवा संघ गोंदिया जिल्ह्याची कार्यकारणी घोषित

0
गोंदिया,दि.13-मराठा सेवा संघ ची  सभा शासकीय विश्राम गृह येथे घेण्यात आली. या सभेत मराठा सेवा संघ गोंदिया जिल्हा कार्यकारणी घोषित झाली. मराठा सेवा संघ जिल्हा अध्यक्ष म्हणून महेंद्र माने , जिल्हा सचिव पदी आशीष जुनघरे तसेच जिल्हा संगठक म्हणून गिरीदास गिरीपुंजे यांना नियुक्ती देण्यात आली . केद्रिय सचिव सोमनाथ लडके यांच्या अध्यक्षते खाली घेतलेल्या या सभेत विभागीय अध्यक्ष प्रमोद बोंडे, अनिल भुसारी ( जिल्हाध्यक्ष भंडारा ), पंकज निबाळकर ( सहसचिव नागपूर) तसेच अजय यावलकर ( सहसचिव प्रसिद्धी ) नागपूर  उपस्थित होते. मराठा सेवा संघ चे मुख्य उद्देश सर्व समाजाला घेऊन चालण्याचे आहे तसेच लोकांची सेवा करण्याचे कार्य आजपर्यंत मराठा सेवा संघ करीत आहे असे मान्यवरा द्वारा सांगितल्या गेले. सभेत गोंदियातील उपस्थितीत विकास बोरकर,सावन डोये, राकेश ठवरे, रवी सपाटे, सविता तूरकर, आदी सदस्य उपस्थित होते. 

Exit mobile version