Home Featured News स्त्रियांनी दुर्बलतेचा कलंक पुसून निर्भय व्हावे-तोशिका पटले

स्त्रियांनी दुर्बलतेचा कलंक पुसून निर्भय व्हावे-तोशिका पटले

0

आमगाव : महिला राष्ट्रशक्तीची जननी आहे. महिलांचा सन्मान महिलांच्याच कार्यकुशलतेने पुढे येऊ शकते. यासाठी स्वत:चे स्वाभिमान राखताना दुसर्‍यालाही त्याचे सन्मान देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे. स्त्रियांनी दुर्बलतेचा कलंक पुसून आता निर्भय होण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्राध्यापिका तोषिका पटले यांनी केले.
गोंदिया जिल्हा तालुका पत्रकार असोसिएशन व ल.भा. अध्यापक विद्यालय आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त महिला सन्मान कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत होत्या.
अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक बी.एन. औटी, उद्बोधक म्हणून प्राध्यापिका तोशिका पटले, डॉ. रेणुका जनईकर, प्राचार्य डॉ.डी.के. संघरी, ए.यू. सज्जल, पत्रकार संघाचे अध्यक्ष पालकराम वालदे, सचिव राजीव फुंडे, रितेश अग्रवाल, नरेंद्र कावळे, यशवंत मानकर मंचावर उपस्थित होते.

महिला सन्मान कार्यक्रमात ज्योती लखन खोटेले यांना सामाजिक कार्यासाठी, डॉ. रेणुका जनईकर यांना उत्कृष्ट आरोग्य सेवा, सुषमा तुलसीदास भुजाडे, पद्मा क्रिष्णा चुटे, निर्मला रामटेके यांना शासकीय प्रतिनिधी व विकास दूत म्हणून, पुष्पा सोयाम यांना आदिवासी महिलांचे प्रबोधन तसेच प्राचार्य ए.ए. सज्जल यांना शिक्षण कार्यातील दखल याबद्दल आयोजकांनी अतिथींच्या हस्ते शाल, श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन गौरव केला.
कार्यक्रमात डॉ.डी.के. संघी, पालकराम वालदे यांनीही समायोचित मत व्यक्त केले. प्रास्ताविक यशवंत मानकर यांनी केले.
संचालन ज्योती बिसेन, सत्यशीला बिसेन यांनी केले. आभार नरेंद्र कावळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्या काकडे, निकिता कावळे, हरीश खरकाटे, निखिल कोसरकर, दीक्षा काकडे, खापर्डे, रमेश चुटे यांनी सहकार्य केले.

Exit mobile version