वाशिम, दि. 09 : बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार, उन्मार्गी मुले आणि इतर बालकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव व सांघिक भावना निर्माण होण्यासाठी वाशिम येथील महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, नालंदा नगर, येथे 11 ते 13 जानेवारीदरम्यान जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उदघाटन 11 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी वसुमना पंत हया करतील. अध्यक्षस्थानी बाल न्याय मंडळाच्या श्रीमती आर.बी. सोरेकर यांची तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बाल कल्याण) संजय जोल्हे, जिल्हा क्रीडा अधिकारी लता गुप्ता, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा डॉ. अलका मकासरे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) राजेंद्र शिंदे यांची उपस्थिती राहणार आहे.
12 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बक्षिस वितरण व समारोप समारंभ 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आला असून प्रमुख पाहुणे म्हणून महिला व बाल कल्याण विभागाचे अमरावती विभागीय उपआयुक्त सुनिल शिंदे हे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी बाल विकास प्रकल्प अधिकारी मिनाक्षी भस्मे यांची तर बाल न्याय मंडळाचे सदस्य प्रा. संदिप शिंदे, ॲड. प्रतिभा वैरागडे, बाल कल्याण समिती सदस्य विनोद पट्टेबहादूर, ॲड. अनिल उंडाळ, डॉ. मंजुश्री जांभरुणकर व बालाजी गंगावणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.





