आम्ही माता-भगिनींच्या संपर्कात राहून त्यांचे प्रश्न सोडवू – सविता विनोद अग्रवाल

0
12

गोंदिया,दि.18ः हळदी-कुंकू या कार्यक्रमांतर्गत गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल यांच्या सौभाग्यवती गावोगावी जाऊन महिलांशी हितगूज साधत आहेत. सविता अग्रवाल या मकरसंक्रांतीचे निमित्त साधून हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून विधानसभा मतदार संघातील इतर गावातील महिलांशी संपर्क साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी गावोगावी भेट देत आहेत. सविता विनोद अग्रवाल यांनी मकर संक्रांतीनंतर 16 जानेवारीपासून गोंदिया शहरातील  बिरसोला,बनाथर,जगनटोला, भादयाटोला,कोरणी,जिरूटोला,सतोना ,धामणगाव, बडेगावं, कोचवाही गोंदिया विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक लहान-मोठ्या गावात हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांच्या भेटी घेतल्या. मातृशक्तीच्या विकासासाठी माझे प्रयत्न नेहमीच जोरदार असतात. त्यांची प्रत्येक छोटी-मोठी समस्या ही माझी स्वतःची समस्या आहे. मला माझ्या क्षेत्रातील मातृशक्ती सक्षम, विकसित आणि समृद्ध पहायची आहे. यासाठी आमचा संपर्क सतत तुमच्यासोबत सदैव राहणार अशी ग्वाही सविता अग्रवाल यांनी दिली.या कार्यक्रमामध्ये सविता विनोद अग्रवाल, कु.नंदाताई वाढीवा,जिल्हा परिषद सदस्या, सौ.इंद्रायणीताई मुनेश रहांगडाले माजी पंचायत समिती सदस्या, सौ.आशाताई फुलसुंगे सामाजिक कार्यकर्ता फुलचुर ,सरपंचा,उपसरपंचा ग्राम पंचायत  सदस्या,अंगणवाडी सेविका,आशावर्कर, पशुसखी, ICRP सखी,FLCRP सखी ,कृषिसखी लेखपाल(ग्राम संघ) तसेच अन्य महिला या दरम्यान उपस्थित होते.