पाणी पुरवठा देयकाची थकबाकी असलेल्या ग्राहकांनी अभय योजनेचा लाभ घ्यावा

0
26

गोंदिया,दि.18 : गोंदिया शहरातील नागरिकांनी ज्यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन आहे व ज्या ग्राहकांकडे पाण्याच्या देयकाची थकबाकी (मुद्दल + व्याज) आहे अशा ग्राहकांकरीता शासनाने व्याज माफी देण्याबाबत ‘अभय योजना’ दिनांक 1 फेब्रुवारी 2022 पासून जाहिर केलेली आहे व शेवटची मुदत 100 टक्के व्याज माफीची दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत आहे. तरी गोंदिया शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेमध्ये सहभागी होऊन ग्राहकांनी त्यांच्याकडे असलेल्या पाणी पुरवठ्याबाबत देयकाची (मुद्दल + व्याज) थकबाकी आहे अशा ग्राहकांनी मुद्दलाची रक्कम एकरकमी भरुन त्यांनी व्याज माफीचा लाभ घ्यावा.

           तसेच जे नागरिक पाणीपट्टीची थकबाकी भरणार नाहीत व ज्या नागरिकांनी अवैधपणे नळ कनेक्शन घेतलेले आहे अशा सर्व लोकांची नळ कनेक्शन बंद करण्याची मोहिम विभागामार्फत राबविण्याची कार्यवाही सुरु करण्यात येत आहे. तरी अवैध कनेक्शन घेतलेल्या ग्राहकांनी आपल्याकडील नळ जोडणी नियमीत करुन घेण्याची कार्यवाही कार्यालयास संपर्क साधून करुन घ्यावी. सविस्तर माहिती प्राप्त करुन घेण्याकरीता ग्राहकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या रेलटोली येथील कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा व योजनेमध्ये समाविष्ट होण्याकरीता अर्ज करण्यात यावा. असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन.एस.गणवीर यांनी कळविले आहे.