Home विदर्भ तिरोडा येथे ‘पोरी जरा जपून’ १७ ला

तिरोडा येथे ‘पोरी जरा जपून’ १७ ला

0
तिरोडा- समाजातील तरुण मुली, महिला व शाळा महाविद्यालयात शिकणारया मुलीना सतर्क करण्याकरिता प्रसिध्द प्रबोधनात्मक कार्यक्रम *“पोरी जरा जपुन”* चे आयोजन १७ फेब्रुवारी २०२३ शुक्रवारला दुपारी १ वाजता भारत रत्न अट्लबिहारी बाजपेयी सभाग्रुहात आयोजित करण्यात आलेला आहे.
सुप्रसिध्द साहित्यिक, लेखिका व कवियत्री प्रा. विजयाताई मारोतकर यांच्या या ३२६ व्या मराठी काव्यमय प्रस्तुती चे आयोजन भगिनी मंडळ तिरोडा, असाटी समाज महीला मंडळ, इंडिया टेक्निकल इंस्टिटयुट , स्वर्ण सखी मंच व समाजसेविका श्रीमती ममता आनंद बैस यांच्या सयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. याप्रसंगी तरुण मुली, महिला व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी अधिकाधिक संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण आयोजकानी केले आहे.

Exit mobile version